नंदुरबार : (जिमाका वृत्त): जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती सर्वंकष माहितीकोषात 1 जुलै 2023 या दिनांकाच्या संदर्भाने अनुसरुन अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी उपसंचालक वि.गु. धनगर यांनी केले आहे.
माहिती अद्ययावत करण्याचे काम https://mahades.maharashtra.gov.in/CGE/home.do या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. ही माहिती कशी भरावी या संदर्भात सूचना संचही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
सर्व कार्यालयानी माहितीकोष आज्ञावली वापरण्याकरिता माहितीकोष-2022 मधील युजर आयडी व पासवर्ड कायम ठेवण्यात आले आहेत. नव्याने निर्माण झालेल्या कार्यालयांसाठी युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन घेण्यासाठी आहरण व संवितकरण क्रमांक, कार्यालय प्रमुखाचे नाव, तसेच नियंत्रणक अधिकाऱ्यांच्या माहितीसह जिल्हा सांख्यिकी कार्यालयास माहिती सादर करावी.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02564-210044, भ्रमणध्वनी क्रमांक 9767263866 (क.भ. अहिरे) वर संपर्क साधावा असेही जिल्हा सांख्यिकी उपसंचालक वि.गु. धनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
असा आहे अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम..
⏰ 17 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन घेणे. तसेच नवीन कार्यालय प्रमुखासाठी आहरण व संवितरण कार्यालयांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित कार्यालय प्रमुख बदलणे.
⏰ 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी माहिती सादर करणे व पहिले प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे. ⏰ 1 डिसेंबर 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्रुटींचे निवारण करुन माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे.