नंदुरबार : अक्क्लकुवा तालुक्यातील दाब येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत 2020-21 वर्षात पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी 5 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथे प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.
या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्याच्या अनुसूचित जातीच्या मुलांना शासनाच्या निर्णयानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत शाळेसाठी पालकांनी सादर केलेल्या प्रवेश अर्जातून शासनाकडून मंजूर असलेल्या 40 जागांसाठी पात्र विद्यार्थ्यांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांनी कळविले आहे.