*अग्निशमन आपत्कालीन सेवेचे बळकटीकरणासह सक्षमीकरण*

नंदुरबार (प्रतिनिधी)- अग्निशमन आपत्कालीन सेवेच्या बळकटीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहन नगर विकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे दिली आहे.

अग्निशमन सेवेतील तूट भरून काढण्यासाठी व या सेवेचा सक्षमीकरणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने अग्निसुरक्षा अभियान राबविण्याचे निर्णय शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे. नंदुरबार शहराचा विस्तार व लोकसंख्या पाहता अग्निशमन वाहनाची गरज लक्षात घेऊन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नगर विकास विभागाकडे वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या दृष्टिकोनातून त्यांनी पाठपुरावाही केला होता.

आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मागणीची दखल घेत अग्निशमन आपत्कालीन सेवेच्या बळकटीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला ९० लाखाचे १ अशा २ वाहनांना १ कोटी ८० लाखाच्या निधी मंजूर केला आहे.

नंदुरबार शहराच्या विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वेळेवर उपाययोजना करण्यासाठी नगर विकास विभागाकडे अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असता नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहनांना मंजुरी मिळालेली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो. – आमदार चंद्रकांत रघुवंशी