नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिला व बालविकास विभागातर्फे महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या समाज सेविका व स्वयंसेवी संस्थांना सन 2015-2016,2016-2017,2017-2018, 2018-2019 व 2019-2020 या वर्षांसाठी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येणार असून पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांनी अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.
महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या नामांकित समाजसेविकांना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय तर स्वयंसेवी संस्थांना विभागीयस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. पात्र संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक कागदपत्रासह आपला प्रस्ताव तीन प्रतीत 15 मार्च 2021 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र.226, टोकरतलाव रोड नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047) येथे संपर्क साधावा.