नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार अवसायक नियुक्तीसाठी अवसायकांचे पुरवणी पॅनेल तयार करण्यासाठी सहकार खात्यातील प्रशासन, लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी नागरी कर्मचारी सहकारी बँकाचे व्यवस्थापक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर अर्ज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय टोकर तलावरोड, खोली क्र. 228 नंदुरबार येथे उपलब्ध असून 18 फेब्रूवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करता येतील. अर्जाची छाननी करुन 1 मार्च 2021 रोजी प्रारुप नामतालिका प्रसिद्ध करण्यात येईल. प्रारुप नामतालिकेवर हरकती असल्यास 5 मार्च 2021 पर्यंत सादर करता येईल. प्राप्त हरकतींवर निर्णय घेवून अंतिम लवाद तालिका 8 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांनी कळविले आहे.