नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासनाने 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दुपारी 3 ते 4 या वेळेत गुगल मीट ॲपच्या या लिंकवर https://meet.google.com/gus-gbap-fvv अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व समाजसेवी संस्था व अल्पसंख्याक विभागाशी संबंधित सर्व सामाजिक संस्था, नागरिकांनी या वेबिनारमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.