नंदुरबार (प्रतिनिधी) – गुजर समाज हा समाजात चालत आलेल्या चालीरीती साठी प्रसिद्ध आहे . या समाजाच्या चालीरीती इतर समाजही पाळताना दिसून येतात ,परंतु गेल्या काही वर्षांपासुन गुजर समाजात नविन चालीरीती रुजु होत असल्याने त्यांना आळा घालावा यासाठी नंदुरबार तालुक्यातील शिंदे या गावात समाजाची बैठक घेण्यात आली या बैठकीत महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या बैठकीत रिंग सेरिमनी बंद.,प्रिवेडिंग शुटींग बंद.,मेहंदी सेरिमनी बंद.
बँड रात्री 11:०० वाजे पावेतो, गरब्याच्या रात्री नवरदेव कींवा नवरी एक दुसर्यांकडे गरबे खेळायला जाणे बंद.नवरदेव आणण्यासाठी फक्त घोडा आणणे, रथ/ बग्गी बंद.,ब्युटीपार्लर फक्त नवरीपुरतेच मर्यादित ठेवने ,बळ फक्त २१ प्रकारचे तेही शक्य असल्यास घरगुती वस्तू देणे आणि लाडु फक्त ५ कीलो देणे,नवरी मुलीस किचन शेट देने बंद.,व्याही-व्याहीनी बोलवण्यासाठी फक्त १० लोकं जातील आणि येतील.
,लग्नात पाकीटांच्या व्यवहार पूर्ण बंद ,आमंत्रण पत्रिका फक्त व्हाट्सअप वरच पाठवली जाईल,आवश्यक असेल तीथेच मुले स्वतःआमंत्रण द्यायला जाणे.,लग्न वेळेवर लागणे.,सोयरीक जुळवितांना चुकीचे सूचना देणाऱ्यावर बहिष्कार.,गर्भ शांती कार्यक्रम बंद,लग्न पंगतीसाठी वाढपी तरुण मित्र मंडळ सज्ज करणे अशा विविध प्रकारचे नियमावली करण्यात आले या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला 11 हजार रु दंड करण्यात येईल असे गुजर समाजाच्या वतीने सांगण्यात आले..