नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय / स्वयंसेवी बालगृहात दाखल असलेल्या पात्रताधारक अनाथ मुलींना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचे हस्ते मुळ अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी जिल्हास्तरावर 14 ते 30 नोव्हेंबर, 2020 या कालावधीमध्ये पंधरवाडा राबविण्यात आला. प्रमाणपत्र वितरीत करतांना जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी मुलींना अधिकारी होण्याबाबत मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते वाचन प्रेरक ग्रंथ व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजितकुमार इंगवले, बाल कल्याण समिती अध्यक्ष विठ्ठल कदम, बाल कल्याण समिती सदस्य नितीन सनेर, मधुकर देसले, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश जाधव, परिविक्षा अधिकारी व अधिक्षक दिनेश लांडगे, विजय साळुंखे, आदी उपस्थित होते.