नंदुरबार दि.22 : अक्कलकुवा येथील 32 वर्षीय महिला आणि शहादा येथील 45 वर्षीय महिला व 32 वर्षीय युवकाला कोविड-19 चा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने दोन्ही शहरात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारीच्या उपाययोना सुरू करण्यात आल्या असून संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे.
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. साधारण 170 गावांना लागून वेगवेगळ्या
जिल्ह्यांच्या सीमा आहेत. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी इतरांना स्पर्श न करणे, वारंवार साबणाने हात धुणे, बाहेरून आल्यावर कपडे स्वच्छ धुणे, दोन व्यक्तीत किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे आदी उपाययोजनांवर भर द्यावा. प्रशानाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

शहादा शहरातील भाग क्र. 7 परिसर प्रतिबंधीत क्षेत्र

शहादा उपविभागीय दंडाधिकारी चेतन गिरासे यांनी भाग क्र. 7 मधील जनता चौक, बागवान गल्ली, इकबाल चौक, क्रांती चौक, पिंजार गल्ली, दातार चौक, गुजर गल्ली, मेन रोड, तुप बाजार, जवाई पुरा, भावसार गढी, सोनार गल्ली, साळी गल्ली, जुना प्रकाशा रोड, न. पा. दवाखाना हॉस्पीटल, गांधी नगर, भाजी मार्केट, बस स्टॉप परिसर, शास्त्री मार्केट, तुलसी मार्ग, अंबाजी मंदीर परिसर, हाजी इसहाक मेमन मिल कंपाऊंड परिसर, काका का ढाबा परिसर, आंबेडकर चौक, चांभारवाडा परिसर, पाणी टाकी चार रस्ता, नगरपालिका परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या क्षेत्रीच्या उत्तरेकडील बसस्थानकापासून ते चावडी चौकापर्यंत, पश्चिमेकडील चावडीचौकीपासून ते जुना प्रकाशा रस्त्यापर्यंत व तेथून न.पा. दवाखान्यापर्यंत, दक्षिणेकडून न. पा. दवाखान्यापासून ते व्हॉलंटरी शाळेलगत भाजी मार्केट पावेतो व पुर्वेकडील भाजीमार्केट पासून ते बसस्थानकापर्यंत अशा प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या चतु:सिमा असतील. या परिसराच्या उत्तरेकडील महावीर चौक (मारवाडी गल्ली), तकीया बाजार, टेक भिलाटी, गौसिया नगर, खेतिया रोड, मिरा नगर पाडळदा रोडपर्यंत भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबत पश्चिमेडील अमरधाम, लुम गल्ली, पिंगाणा पुल, आझाद चौक, सरदार पटेल चौक, कुकडेल, पटेल
चौक, गुजर गल्ली, शिवाजी चौक, जुना प्रकाशा रोड, दक्षिणेकडील गांधीनगर, एच.डी.एफ.सी. बँक, विकास हायस्कुल परिसर, स्टेट बँक परिसर, स्वामी समर्थ मंदीर परिसर आणि पुर्वेकडील महालक्ष्मी नगर, नितीन नगर, पटेल रेन्सीडेन्सी रोड, सिद्धीविनायक मंदीर परिसर, कॉर्ट परिसर, जुने तहसिल परिसरापर्यंतचे क्षेत्रदेखील बफर झोन म्हणून जाहीर केले आहे.
प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यास मुभा राहील. अशी सेवा पुरविणाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना सुरक्षा पास उपलब्ध करून देण्यात येतील. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्याजाण्याच्या ठिकाणी उष्म चाचणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेवकांनी ये-जा करणाऱ्या सर्वांची छाननी करावी. प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींची नोंद घेण्यात येईल. भौगोलीक विलगीकरण क्षेत्रात जाणाऱ्या व्यक्तींना औषधांचा डोस देण्यात येईल. या क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक
राहील. आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू

प्रशासनाने निर्जंतुकीकरण करण्यासाठी परिसरात चारवेळा फवारणी केली आहे. घरोघरी जावून
वैद्यकीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील 13 आणि अन्य 3 संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे.


नागरिकांसाठी घरपोच सुविधा

प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी नियोजन केले
आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. वस्तू किंवा सेवा आवश्यक असल्यास मंडळ अधिकारी पी.बी.अमृतकर (9422238255), न.पालिकेचे चेतन गांगुर्डे (8275563939) किंवा पोलीस हवालदार जलाल शेख (9637587620) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन श्री.गिरासे यांनी केले आहे.


अक्कलकुवा शहरातील भाग क्र. 2 परिसर प्रतिबंधीत क्षेत्र

तहसिलदार अक्कलकुवा तथा इंन्सीडेंट कमांडर विजयसिंग कच्छवे यांनी भाग क्र. 2 मधील कोंडवाडा गल्ली (पुर्वेकडील भाग) दर्गा रोड (फेमस चौकाजवळील भाग), हवालदार फळी (दक्षिणेकडील भाग) प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. उत्तरेकडील अनिस अहमंद फत्तेमहमंद यांच्या घरापासून उत्तरेकडील दर्गारोड परिसर, पश्चिमेकडील कोंडवाडा गल्लीतील पारस अशोकचंद सोलकी यांच्या घरापासून, दक्षिणेकडून फेमस चौक, पुर्वेकडील इंदिरानगर परिसर अशा प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या चतु:सिमा असतील. या परिसराच्या उत्तरेकडील दर्गारोड परिसर, केशव नगर,बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबत पश्चिमेकडील कोंडवाडा गल्ली, दक्षिणेकडील फेमस चौक परिसर, कुंभार गल्ली आणि पुर्वेकडील इंदिरा नगर परिसर हे क्षेत्रदेखील बफर झोन म्हणून जाहीर केले आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यास मुभा राहील. अशी सेवा पुरविणाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना सुरक्षा पास उपलब्ध करून देण्यात येतील. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्याजाण्याच्या ठिकाणी उष्म चाचणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेवकांनी ये-जा करणाऱ्या सर्वांची छाननी करावी. प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींची नोंद घेण्यात येईल. भौगोलीक विलगीकरण क्षेत्रात जाणाऱ्या व्यक्तींना औषधांचा डोस देण्यात येईल. या क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक राहील. आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासन सतर्क, परिसराचे निर्जंतुकीकरण

अक्कलकुवा शहरात तीनवेळा औषध फवारणी करण्यात आली आहे. परिसरातील प्रत्येक घरात
वैद्यकीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरात बॅरेकेडींग करण्यात आले आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात वाहनांना पुर्णत: बंदी करण्यात आली आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर चार व्यक्तींना पूर्वीच क्वॉरंटाईन करण्यात आले होते. याशिवाय प्राथमिक संपर्कातील 19 व्यक्तींचे स्वॉब घेण्यात येत आहेत. तर दोन व्यक्तींना अक्कलकुवा येथे क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती

प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू अथवा सेवा घरपोच देण्यात येणार असून त्यासाठी संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या क्षेत्रातील नागरिकांनी उप अभियंता एस.आर.पवार (9404565693), सहा. अभियंता के.एम.राठोड (9284502984) किंवा तलाठी जी.डी.साखरे (9028905103) यांच्याशी संपर्क साधावा