नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार येथील वे.खा.भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित,श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात “‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत – स्वच्छतेवर आधारित घोषवाक्य स्पर्धा व रॅलीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी अधिव्याख्याता डाएट डॉ. राजेंद्र महाजन, न.पा.स्वच्छता आरोग्य निरीक्षक रवींद्र काटे, न.पा.आरोग्य अभियंता विशाल कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माननीय मुख्याध्यापक राहुल मोरे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शाळा व आजूबाजूच्या परिसराचे स्वच्छता करण्यात आली त्यानंतर स्वच्छतेवर आधारित रॅलीस मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत परिसरातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे या अनुषंगाने घोषणा दिल्याने परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.