नंदुरबार (प्रतिनिधी) – नवापूर येथील जेष्ठ पत्रकार श्रीकांत बाबा पाठक यांची प्रकृती अचानक खालावली होती त्यांच्या परिवाराने आणि नवापूर येथील स्थानिक पत्रकारांनी नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाला सदर घटनेची माहिती दिल्या नंतर बाबा पाठक यांना नंदुरबार येथील छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मदतीचे अवाहन करण्यात आले होते त्याला नंदुरबार जिल्हयातील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद दिला असून बाबा पाठक यांच्या मदतीसाठी 32803 रुपये जमा झाले होते आज जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मदत निधी बाबा पाठक यांच्या मुलगा प्रतीक पाठक याचा कडे छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे जाऊन मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी समन्वयक विशाल माळी ज्येष्ठ पत्रकार रमेश महाजन,पत्रकार भिकेश पाटील,गौतम बैसाने कल्पेश मोरे उमेश पांढरकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले
नंदुरबार जिल्हा पत्रकार संघ अडचणीत असलेल्या पत्रकारांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहत असतो. जिल्हयातील पत्रकारांनी विश्वास दाखवत अडचणीत असलेल्या पत्रकाराच्या परिवाराला मदत करत एकीचा संदेश दिला आहे