नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभाग विभागातर्फे जिल्हा अंतर्गत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मधील सुप्त गुणांना वाव मिळावा  म्हणून या स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत करण्यात आले होते .आज या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गोविंद चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप पुंड सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी अमित पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार डॉक्टर संजीव वळवी, डॉ. हरिष कोकणी व आरोग्य विभागातील अधिकारी ,व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी जिल्हा कार्यालय विरुद्ध जिल्हा क्षयरोग व कुष्ठरोग सोसायटी ,धडगाव तालुका विरुद्ध अक्कलकुवा तालुका नंदुरबार तालुका विरुद्ध नवापूर तालुका व शहादा विरुद्ध तळोदा असे क्रिकेटचे सामने भरवण्यात आले. पहिल्या सामन्यात जिल्हा क्षयरोग व कुष्ठरोग सोसायटी यांनी बाजी मारली दुसऱ्या सामन्यात अक्कलकुवा तिसरा सामन्यात  नवापूर तर चौथा सामन्यात तळोदा संघाने बाजी मारली. उद्या  जिल्हा क्षयरोग व कुष्ठरोग सोसायटी व तळोदा तालुका तसेच नवापूर तालुका व अक्कलकुवा तालुका यात व सेमी फायनल मॅच भरण्यात येणार असून यातून विजेता संघांमध्ये फायनल मॅच भरवण्यात येणार आहे.