नंदुरबार (जिमाका वृत्त) – शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत अशासकीय संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी र.सो.खोडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्था, स्थानिक शेतकरी, सरकारी साखर कारखाने यांना यंत्रसामग्री आणि इंधन या दोन्हींचा खर्च देणे प्रस्तावित असून अल्प, अत्यअल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेचे प्रस्ताव नंदुरबार व नवापूर तालुक्यासाठी wco.nandurbar@yahoo.com,  शहादा व तळोदा तालुक्यासाठी sdo.ssiwcshahada@gmail.com  व धडगांव व अक्कलकुवा तालुक्यासाठी sdo.swcdhadgaon@gmail.com  या ईमेल पत्त्यांवर  अथवा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग, पद्मावती नगर प्लॉट नं. 17 श्रमसाफल्य् इमारत धुळे रोड, नंदुरबार  येथे  प्रस्ताव सादर करावेत.

जिल्हास्तरीय समितीकडे आलेल्या प्रस्तावावर वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने संबंधित संस्थांची पात्रता व क्षमता तपासून एका जलसाठ्यासाठी एका संस्थेस गाळ उपसण्यास मान्यता देण्यात येईल असेही जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. खोडे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.