Category: क्रीडा

राज्य क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करावे

नंदुरबार  (जिमाका वृत्तसेवा) : राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन त्याना शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास,अद्यावत क्रीडा सुविधा व क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी खेळाडूंनी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळसेवा प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी अर्हता पुढील प्रमाणे आहे. क्रीडा प्रबोधिनीतील सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी खेळाडू हा संबधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे ( 1जानेवारी 2003 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा ) अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची तज्ञ समितीकडून चाचणी करुन प्रवेश 50 टक्के देण्यात येईल.             क्रीडा प्रबोधिनीत खेळ निहाय कौशल्य चाचणीसाठी संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे ( 1 जानेवारी 2003 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा ) अशा खेळाडूना संबंधित खेळाचे कौशल्य चाचणीचे आयेाजन करुन गुणानुक्रमे 50 टक्के प्रवेश देण्यात येईल.             अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेऊन त्याआधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल. अनिवासी खेळाडूंची संख्या एका क्रीडा प्रबोधिनीत 25 अशी असेल.             अमरावती-अर्चरी, ज्युदो, नागपूर हॅण्ड बॉल व ॲथलेटिक्स, अकोला बॉक्सिंग व ॲथलेटिक्स, गडचिरोली ॲथलेटिक्स, ठाणे...

Read More

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारद्वारा  सन 2018 व 2020 या दोन वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार  जाहीर करण्यात आले आहेत.  जिल्हा युवा पुरस्काराचे स्वरुप युवक व युवती यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र व  दहा हजार रुपये रोख स्वरुपात तसेच युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेस सन्मानचिन्ह, गौरवपत्र व  50 हजार या प्रमाणे देण्यात येणार आहे. सन 2018 वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक) जगदीश सुरेश वंजारी तर जिल्हा युवा पुरस्कार (युवती ) साठी कु.रोमाना इम्रान पिंजारी, यांना तर  जिल्हा युवा पुरस्कार (संस्था ) म्हणून नंदुरबार तालुका विधायक समिती, नंदुरबार  या संस्थेस देण्यात येणार आहे. सन 2020 वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक ) ऋषिकेश भालचंद्र मंडलिक यांना तर जिल्हा युवा पुरस्कार (युवती) साठी कु.पल्लवी रविंद्र प्रकाशकर यांना देण्यात येणार आहे. 2020 साठी जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) तसेच सन 2019 या वर्षांत जिल्हा युवा पुरस्कार युवक व युवती तसेच जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) साठी एकही पुरस्कारासाठी पात्र नसल्यामुळे यावर्षांचा पुरस्कार निंरक समजण्यात यावा. सदर पुरस्कार कोविड नियमान्वये नंतर प्रदान करण्यात येणार आहे. असे  जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले...

Read More

जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना क्रीडा पुरस्कार जाहीर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारद्वारा  सन 2021-2022 या वर्षांसाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार  जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, गौरवपत्र व  दहा हजार रुपये रोख स्वरुपात देण्यात येणार आहे. सन 2021-2020 वर्षांसाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार म्हणून श्रीराम अरुण मोडक तर गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष ) म्हणून परिक्षित प्रगतीचंद्र बोरसे ,गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला) हर्षदा शिवदा पाडवी तर गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कार म्हणून कालीदास वरतु वसावे यांना देण्यात येणार आहे. सदर पुरस्कार कोविड नियमान्वये नंतर प्रदान करण्यात येणार आहे. असे  जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले...

Read More

नंदुरबार येथे एक जानेवारी रोजी होणार ऑनलाइन युवा महोत्सव

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या महोत्सवात इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी  सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.              युवकांमध्ये एकात्मकतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून  युवा वर्गातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येते. या युवा महोत्सवात लोकनृत्य 20 कलाकार संख्या, लोकगीत 10 कलाकार संख्या या दोन प्रकारात स्पर्धा होईल. यासाठी जिल्ह्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील 31 डिसेंबर 2021 पर्यंत प्रवेश अर्ज dsondb@gmail.com या ई-मेलवर सादर करावे. प्रवेश अर्ज सादर करताना अर्जावर व्हॉट्सॲप क्रमांक असणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी जगदीश चौधरी (9422834187 ) यांच्याशी संपर्क...

Read More

चौथ्यां खेलो इंडिया युथ गेम्स 2022 करीता जिल्हा निवड चाचणीचे आयेाजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   चौथ्यां खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन 5 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हरियाणा येथे होणार आहे. यास्पर्धेसाठी महाराष्ट्रातील खो-खो, कबड्डी व बास्केटबॉल हे खेळ पात्र ठरले असून 18 वर्ष वयोगटातील मुले व मुलीची राज्य संघ निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर निवड चाचणीचे 22 नोव्हेंबर 2021 रोजी आयेाजन करण्यात आले आहे.             कबड्डी व खो-खो खेळासाठी यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे तर बास्केटबॉल खेळासाठी जी.टी.पाटील महाविद्यालय,नंदुरबार येथे सकाळी 9.30 वाजता निवड चाचणी होईल.             राज्य संघ निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी पात्रता अशी, कबड्डी खेळासाठी वजन गट मुले 70 किलो व मुलीसाठी 65 किलो असेल.खेळाडूचा जन्म हा 1 जानेवारी 2003 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. खेळाडूकडे आधारकार्ड, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, जन्मप्रमाणपत्र (5 वर्षांपुर्वी काढलेले ) यापैकी कोणतेही दोन कागदपत्र असणे आवश्यक असेल.या निवड चाचणीत शाळा, क्लबच्या संघांना प्रवेश देण्यात येईल. तर शाळाबाह्य तसेच संघातुन सहभागी होवू न शकणाऱ्या खेळाडूंना निवड चाचणीसाठी संधी देण्यात येईल. स्पर्धा व चाचणी त्या त्या खेळाच्या अधिकृत संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येईल. निवड चाचणीचे आयोजन खेलो इंडिया युथ गेम्ससाठी राज्य संघ निवड  करण्यासाठी करण्यात येत  असल्यामुळे यासाठी कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार नाही.             अधिक माहितीसाठी क्रीडा  मार्गदर्शक, जगदीश चौधरी ( 9422834187 ) यांच्याशी संपर्क साधावा. राज्य संघ निवड करण्यासाठी जिल्हा निवड चाचणीत जिल्ह्यातील शाळा,कनिष्ट महाविद्यालय, क्रीडा मंडळे यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिव्यांग व जात प्रमाणपत्र सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता सहावी नियमित व इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील अनुशेष भरण्याकरीता पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली होती. दिव्यांग प्रवर्गातील अर्ज सादर करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी परिक्षा दिली अशा विद्यार्थ्यांनी 4 जुलै 2022 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा कार्यालयात मुळ दिव्यांग प्रमाणपत्रासह समक्ष हजर राहावे. तसेच अनुसूचित जमाती, आदिम जमातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले जात प्रमाणपत्राचा दाखला घेवून यावे. असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी कळविले...

अल्पसंख्यांक शाळा, महाविद्यालयांनी पायाभूत सुविधा अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्यांक शाळा,कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी अनुदान योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून या योजनेतंर्गत सन 2022-2023 मध्ये अनुदान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी 7 ऑक्टोंबर 2015 च्या शासन निर्णय मधील अटी व शर्तींनुसार विहित नमुन्यातील अर्ज 31 जुलै 2022 पर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले...

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  सन 2022-2023 या आर्थिक वर्षांसाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली असून या योजनेतंर्गत अनुदान घेवू इच्छिणाऱ्या मदरसांनी 30 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले...

Loading

All

Latest

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ अखंडीतपणे मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी त्वरीत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.             सन्मान योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड घेवून सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ई-केवायसी करावी. तसेच  लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत जे शेतकरी ई-केवायसी करतील अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार असल्याने  31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी...

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  अपर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये  17 जून 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून  1 जुलै 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

वृद्धाश्रमांना माहिती सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात चालवित असलेल्या  वृद्धाश्रम संस्थांनी त्यांची माहिती  21 जून 2022 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,‍ जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या कार्यालयात सादर करावी. सदर वृद्धाश्रमांची माहिती शासनास सादर करण्यात येणार असून या माहितीच्या आधारे नोंदणीकृत वृद्धाश्रमांना भविष्यात विविध योजनांचा लाभ देणे यामुळे शक्य होणार आहे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगांवकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0158884
Visit Today : 55
error: Content is protected !!