Category: क्राईम

कोरोनाबाबत सूचना न पाळल्यास दंडात्मक कारवाई -डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या सूचना न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देण्यासाठी प्रशासनातर्फे  विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर जाण्याची परवानगी असलेल्या प्रत्येक नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या सुचनेचे पालन करणे आवश्यक आहे. परंतू अद्याप काही नागरीक यांचे पालन करतांना आढळून येत नाही.  त्यामुळे प्रशासनाने दंडात्मक कारवाईचे आदेश यापूर्वी निर्गमित केले होते. सुधारीत आदेशानुसार दंडाच्या रक्कमेत सुधारणा करण्यात आली आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकताना प्रथम आढळल्‍यास रु.200 इतका दंड आकारण्यात येईल, दुसऱ्यांदा रु.400 आणि तिसऱ्यांदा रु.400 दंड व फौजदारी कारवाईस पात्र राहील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क, रुमाल न वापरल्यास प्रथम रु.200 दुसऱ्यांदा रु. 400 तर तिसऱ्यांदा रु.400 दंड व फौजदारी कारवाई  करण्यात येईल. शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन न केल्यास प्रथम रु.200 दंड प्रतिग्राहक, व्यक्ती, प्रती आस्थापना मालक-विक्रेता, दुसऱ्यांदा रु.400 दंड, तर तिसऱ्यांदा आढळल्यास रु.400 दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस व महसूल कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले असून सर्व नागरीकांनी याचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

तोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्‍हा पोलीस दलामार्फत तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सींगचे पालन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असून गेल्या 8 ते 10 दिवसात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने सर्व नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे व सामाजिक अंतराचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.             जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये व त्यावर आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तोंडाला मास्क न लावणाऱ्या तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस दलामार्फत गुन्हे दाखल करण्यात येणार असून अशा व्यक्तींना प्रत्येकी 2 हजारपर्यंत द्रव्य दंड किवा 5 दिवसाची कैद अशी शिक्षा होऊ शकते. कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे,  असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी केले...

Read More

नंदुरबार जिल्हा रुणालयात आहार सेवेत मोठा आर्थिक घोटाळा !

नंदुरबार (प्रतिनिधी) :– येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्ण व सोबतच्या एका नातेवाईकास पुरविण्यात येत असलेल्या आहार खर्चात जास्तीची बिले  काढत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले असून, याबाबत श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक या संस्थेचे  चेअरमन पंढरीनाथ शिवराम भोये,  व्हा. चेअरमन काशिनाथ माधव ढोमसे,  संस्थेचे प्रतिनिधी शरद बाळासाहेब देवरे व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याविरुद्ध आरटीआय कार्यकर्ते भरत देशमुख यांनी पुराव्यानिशी तक्रार केली आहे. याबाबत सविस्तर असे कि, जिल्हा रुग्णालय आहार सेवेचे कंत्राट घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था नाशिक या संस्थेला जिल्हा रुग्णालय नंदुरबार व सर्व ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल रुग्णांना व त्याच्या...

Read More

अनोळखी मृतदेहाबाबत आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  नवापूर तालुक्यातील भादवड रेल्वे स्टेशन जवळ अनोळखी पुरुष मृतदेह आढळून आला असून  त्याबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरिक्षक  विसरवाडी पोलीस स्टेशन यांनी केले आहे. मृतदेहाची उंची 5 फुट 5 इंच, वय अंदाजे  30 ते 35 वर्षे असुन सडपातळ बांधा, गोल चेहरा,निमगोरा रंग, अंगात हिरव्या काळ्या पांढऱ्या रंगाचा कॉटनचा फूल बाहीचा शर्ट, काळ्या रंगाचा व आकाशी रंगाची बरमुडा पॅन्ट, बारीक केस, छातीच्या उजव्याबाजुस ममता नाव गोंधलेले...

Read More

१० दुकादारांना ४२ हजार दंड

नंदुरबार (प्रतिनिधी):- शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात दुकाने सुरु ठेवणाऱ्या १० दुकानदारांना न्यायालयाने तब्बल ४२ हजार रुपये दंड ठोठावला आहे.कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी व नियंत्रण आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे आदेश पारीत केलेले असतांना व पुढील आदेशापावेतो दुकाने सुरु ठेवणार नाही, असे आदेश दिलेले आहेत, असे माहिती असतांना देखील दुकाने सुरु ठेवुन प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करतांना दि .१९ मे २०२० रोजी महसुल, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, नंदुरबार शहर पोलीस यांचे संयुक्त कारवाईत १९ दुकानांत मालक व कामगार मिळुन आले होते.या कारवाईत बॉम्बे ट्रेडर्स, ओम शांती मॅचिंग, आनंद गिफ्ट हाऊस, मोदी हॅण्डलुम, अंबर मॅचिंग, अरीहत कलेक्शन, सिध्दार्थ सिलेक्शन, कुशल कलेक्शन, बालाजी साडी आणि जगदंबा कलेक्शन ही दुकाने प्रतिबंधीत क्षेत्रात सुरु असल्याचे आढळुन आले होते. त्यांच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस टाणेत भा.द.वि.क .१८८, २६८, २६९, २९०, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील दुकान मालक व त्यात काम करणारे आरोपी बॉम्बे ट्रेडर्स मधील विनोद चंदरमल मंदाणा, (मालक) विक्रम बजाज, सतिष माळी, गोपाल बागले, हर्षल परदेशी, अनिल वासवाणी, शंकर मंदाणा, आनंद गिफ्ट मधील राम गुरुबक्षाणी, ओमशांती मॅचिंग मधील अशोक जैन (मालक), बालाजी साडी व जगदंबा कलेक्शन मधील शंकर हरगुनदास तररेजा, रोहीत शत्रुघ्न गेही, आदनेश किरण सौपुरे, दलपतसिंह सवाईसिंह राजपुत, गुलाबसिंह सवाईसिंह राजपुत आणि मोदी हॅण्डलुम, अंबर मॅचिंग, अरीहंत कलेक्शन, सिध्दार्थ सिलेक्शन, कुशल कलेक्शन मधील कुंदन मोहनलाल कटारीया, सोनलकुमार विपीनचंद्र वाणी, विशाल मोतीराम शिंदे, गीतमचंद पुखराज जैन, सिध्दार्थ गौतमचंद जैन, सुनिलकुमार शंकरलाल देसरडा, शैलेश नरेंद्र जैन यांचा समावेश होता.त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस . ए...

Read More

गुटखा, सिगारेट विक्रेत्यांची चंगळ चार पट भावात विक्री – जनतेची लूट

नंदुरबार (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला धुडकावत जिल्हाभरात गुटखा तंबाखू व सिगरेटची तब्बल चार ते पाच पट दराने विक्री होत असल्याने सामान्य जनतेच्या व्यसनापोटी प्रचंड लूट होत असल्याचे दिसत असून, याप्रकरणी संबंधित विभागाने दूर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात सर्व पण तंबाखू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे टपऱ्या सील करण्यात आल्या. मात्र, यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेली काही तरूण मंडळी गुटखा, बार, तंबाखू, सिगारेटसाठी आतूर झालेली पहायला मिळाले. त्यामुळे गैरफायदा घेण्यात पटाईत असलेल्या काही गुटखा किंग मंडळी अव्वाच्या सव्वा भावात गुटखा व तंबाखू विक्री करतांना दिसत आहेत. काही व्यवसायीक तर चक्क व्हाॅटसपवर यादी मागवून पानपट्टी माल म्हणजे गुटखा पुड्या, तंबाखू पुड्या व सिगारेट थेट घरी पोहच करत असल्याचे बोलले जात आहे. काही किराणा दुकानदार व्हि.आय.पी. ग्राहकालाच गुटखा विक्री करत आहेत. या साऱ्या प्रकारामुळे कोरोना विषाणूचे गांभीर्य कुणालाही नसल्याचे प्रदर्शित होत असून, व्यवसायीकांनी मात्र चंगळ करून घेतली आहे.काही तरूण मुले लॉकडाऊनच्या काळात चौका चौकात गुटखा, तंबाखू, सिगारेट विक्री करतांना दिसत आहेत. 3 तारखेला दुकाने उघडल्यानंतरही पण सिगारेटची दुकाने उघडतील अशी शक्यता नाही. त्यामूळे ही बेकायदा गुटखा तंबाखू विक्री कोणत्या स्तरावर पोचेल, हे सांगणे कठीण आहे. याप्रकरणी एफ.डि.ए. विभागाने लक्ष घालणे गरजेचे असून, कारवाई होणे महत्वाचे...

Read More

वाळुच्या डंपरमध्ये विमल गुटख्याची वाहतुक चौघे ताव्यात , ३४ लाखाचा गुटखा जप्त

नंदुरबार :- गुजरात राज्यातून महाराष्ट्रात आणलेला सुमारे 34 लाख रुपयांचा गुटखा नंदुरबार पोलिसांनी हस्तगत केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या “ऑपरेशन वॉश आउट” चे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून, पोलिसांनी ही कार्यवाही सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे .सध्या संपुर्ण जगभरासह भारतात थैमान घातलेल्या कोराणा विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने संपुर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत केलेले आहे . नंदुरबार जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून खबरदारीच्या सर्व उपाय योजना राज्य शासन युध्द पातळीवर करीत आहे. यातच महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा गुजरात राज्यातुन नंदुरबार जिल्ह्यात आणुन लॉकडाऊनचा फायदा घेवुन त्याची जास्त दरात विक्री होत होता. त्यानुसार आज दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी गुजरात राज्यातुन निझरमार्गे नंदुरबार येथे मोठया प्रमाणात विमल गुटखा वाहतुक होणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दिनांक १५ रोजी रात्री ११ वाजेपासुन निझर रोडवर मन्सुरी टेन्ट हाऊसजवळ सापळा लावला. आज दि . १६ रोजी सुमारे पहाटे ०१ . ३० वाजेच्या सुमारास निझर गावाकडुन एक हायवा डंपर नंदुरबारच्या दिशेने येताना दिसला. म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या सहाय्याने वाहनास उभे करण्याचा इशारा दिला असता संशयीत वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला , म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन शिताफीने वाहनाला थांबवुन डंपरमध्ये चालक व सोबत ३ इसम बसलेले दिसले. त्यात आकेश काशिनाथ नाईक वय – २४, २ ) मनिष...

Read More
Loading

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – ११६१ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

प्रत्येक चांगल्या विचाराची
पहील्यांंदा चेष्टाच होते,
मग त्याला विरोध होतो,
आणि
शेवटी त्याच विचारांचा
स्वीकार होतो !
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Every good thought
is mocked at first,
then it is opposed,
and in the end
the same thought
is accepted !

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
मास्कचा नियमित वापर करा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
७ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय
त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना
जागरूकता दिन !
१८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक
कृष्णाजी केशव दामले
तथा केशवसुत,
(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)
१९१४: गझल, ठुमरी गायिका
बेगम अख्तर,
(मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४)
१९१७: बालकुमार साहित्यिक
विनायक महादेव
तथा वि. म. कुलकर्णी,
(मृत्यू: १३ मे २०१०)
१९६०: शास्त्रीय गायिका
आश्विनी भिडे-देशपांडे,
१९७८: क्रिकेटपटू
जहीर खान
यांचा जन्मदिन !
१७०८: शिखांचे १० वे गुरू
गुरू गोबिंद सिंग,
(जन्म: २२ डिसेंबर १६६६)
१९७५: कवी, विचारवंत
देवनहळ्ळी गुंडप्पा
तथा डी. व्ही. जी.,
(जन्म: १८ जानेवारी १८८९)
१९९८: महसूलमंत्री, काँग्रेस नेते
पद्मश्री भाऊसाहेब वर्तक,
१९९९: बाल साहित्यिक
उमाकांत निमराज ठोमरे
(जन्म: १५ ऑगस्ट १९२९)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0044764
Visit Today : 238
error: Content is protected !!