Category: शासकीय

नंदूरबार जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी सहकार्याचे प्रशासनाचे आवाहन

नंदूरबार (जिमाका) – अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणावर विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुद्धा होण्याची शक्यता असते. नंदूरबार जिल्ह्यातही यादिवशी बालविवाह होणार नाही, यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात लागू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पोलीस विभाग, बालकल्याण समिती, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका इत्यादी यंत्रणेची मदत घेण्यात येईल. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 च्या कलम 9 नुसार प्रौढ पुरुषाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास दोन वर्षे पर्यंत सक्षम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम दहा नुसार बाल विवाह जुळवून आणणे किंवा जबरदस्तीने बालविवाह लावण्यास प्रवृत्त करणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम 11 नुसार बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्या किंवा बालविवाहास परवानगी देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत, होत असल्यास याविषयी नागरिकांनी प्रशासनास सूचित करावे. असे आवाहन श्री. वंगारी यांनी केले...

Read More

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

नंदुरबार जिमाका वृत्तसेवा) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील 319 गावे आतापर्यंत तंटामुक्त झालेली आहेत. उर्वरित गावांनीही या मोहिमेत सहभागी होवून गाव तंटामुक्त करावे. त्यासाठी प्रशासनाने या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी येथे दिल्या. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मीनल करनवाल, प्रभारी पोलिस अधीक्षक श्री. विजय पवार, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशनचे प्रभारी यांच्यासह तंटामुक्त गाव मोहिम समितीचे सदस्य उपस्थित होते....

Read More

‘सामाजिक समता सप्ताहा निमित्ताने’ 11 एप्रिल रोजी वेबिनारचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 6 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती,नंदुरबार यांच्यामार्फत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सोमवार 11 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3 वाजता गुगल मीट ॲपवर वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. अर्जदारांची कार्यालयात गर्दी कमी करुन अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता शासनाने ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येतात. त्यासाठी जात पडताळणीसाठी अर्ज कसे सादर करावे, अर्ज सादर करतांना कोणते दस्तऐवज जोडावे. तसेच ज्या अर्जदारांना त्रृटी पूर्ततेबाबत एसएमएस व ई-मेल आले आहे.अशांनी त्रृटींची पुर्तता. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन गुगल मिट ॲपवर वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. यावेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी link: meet.google.com/hqe-dsun-ewo ही लिंक करुन देण्यात आली आहे. तरी सर्व प्राचार्य, कर्मचारी,मुख्याध्यापक विद्यार्थी,इंटरनेट कॅफे चालक, पालकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्राची वाजे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांनी  केले...

Read More

मासिक भाडेतत्वावर वाहन लावण्याबाबत दरपत्रक सादर करणे बाबत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत उपजिल्हाधिकारी, सरदार सरोवर सरदार सरोवर प्रकल्प, तळोदा या कार्यालयासाठी इनोव्हा या प्रकारातील प्रत्येकी 1 डिझेल वाहन वाहनचालकासह व विना इंधन मासिक भाडेतत्वावर लावण्यासाठी सीलबंद लिफाफ्यात दरपत्रक मागविण्यात आले होते. परंतू यासाठी एकही दरपत्रक प्राप्त न झाल्यामुळे द्वितीय अंतिम मुदतवाढ  देण्यात येत असून दरपत्रक धारकांनी  18 एप्रिल 2022 पर्यंत उपजिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, नंदुरबार येथे डिझेल वाहन लावण्यासाठी दरपत्रक सादर करावे.अटी व शर्ती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर यांनी  एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले...

Read More

भूमि अभिलेख विभागास रोव्हरची पाच यंत्रे उपलब्ध

नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागासाठी पाच अद्ययावत रोव्हर यंत्र उपलब्ध झाले असून त्यांचे तालुकानिहाय वितरण जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते आज करण्यात आले. सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी प्रशांत बिलोलीकर, उप अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गावित, शांताराम उशिरे, सतिष बोरसे, श्रीरामचंद्र कुवर, शिबल्या वळवी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी रोव्हर यंत्राची माहिती घेवून यंत्राचा कार्यक्षमतेने उपयोगाच्या सुचना भूमी अभिलेख विभागास दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण योजनेच्या माध्यमातून 95 लाख 89 हजार इतका निधी हे यंत्र व इतर अनुषंगिक साहित्य घेण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. हे नवे यंत्र प्राप्त झाल्याने नियमित...

Read More

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची 39 कोटीची विक्रमी महसूल वसूली गत वर्षांपेक्षा वसूलीत 1 कोटी 66 लक्ष रुपयांची वाढ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सन 2021-2022 या आर्थिक वर्षांत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन कर, पर्यावरण कर, नोंदणी शुल्क, परवाना शुल्क, तडजोड शुल्क, इत्यादीच्या माध्यमातून 39 कोटी 63 लक्ष एवढ्या रक्कमेची वसूली करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे. गत वर्षांच्या तुलनेत यावर्षी एकूण वसूलीमध्ये 1 कोटी 66 लक्ष रुपयांची वाढ झाली आहे. यासाठी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन कारवाई करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात एक वायुवेग पथक कार्यरत करण्यात आला होता. या पथकाद्वारे सन 2021-2022 या वर्षांत ओव्हर लोड वाहतूक, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, वाहनांमध्ये अनाधिकृत बदल करणे, यांत्रिकदृष्टया वाहन सुस्थितीत नसणे, वाहनाचा विमा नसणे इत्यादी विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या 2 हजार 325 वाहनांविरुध्द कारवाई करुन 3 कोटी 38 लक्ष रुपये तडजोड शुल्क व कर वसुली करण्यात आली आहे. तर दारु पिऊन वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, धोकादायकरित्या वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक करणे इतयादी गुन्ह्यांकरीता 217 वाहनचालकांचे ड्रायव्हींग लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र गुजरात सिमेवर असलेल्या नवापूर सिमा तपासणी नाका येथे या वर्षांत 31 हजार 627 वाहनाविरुध्द कारवाई करुन 9 कोटी 18 लक्ष  तसेच अक्कलकुवा सिमा तपासणी नाका येथे 10 हजार 323 वाहनांकडून 3 कोटी 88 लक्ष रुपयांची तडजोड शुल्क व कर वसुली करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात सन 2021-2022 वर्षांत एकूण 12 हजार 179 नवीन वाहनांची नोंद झाली असून त्यात 9 हजार 158 दूचाकी, 1 हजार 165 कार/जीप, 61 रुग्णवाहिका, 1 हजार...

Read More

शासकीय कार्यालयात येणाऱ्यांसाठी नंदुरबारला उद्यापासून हेल्मेट सक्ती

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील सर्व शासकीय  कार्यालयांमध्ये एप्रिल 2022 पासून कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिक ,कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर करणे सक्तीचे असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  हे विना हेल्मेट दूचाकी वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हेल्मेट तपासणी मोहिम घेण्यात येणार असून या नियमाचे पालन न केल्यास  मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 नुसार दूचाकी चालकास तसेच प्रवास करणाऱ्या व्यक्तींविरुध्द प्रत्येकी 500 रुपये दंड व अनुज्ञप्ती (लायसन्स) 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी दूचाकी वाहनांचा वापर करताना हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन करण्यात आले...

Read More

निवृत्तीवेतनधारकांचे वेतन 5 एप्रिलनंतर वितरीत होणार

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारकांचे माहे मार्च 2022 चे निवृत्तीवेतन मार्च अखेरीस आर्थिक लेख्यांचे  कामकाज पुर्ण करावयाचे असल्याने 5 एप्रिल 2022 नंतर संबंधित बँकेत पाठविण्यात येईल. याबाबत सर्व निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील यांनी केले...

Read More

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केली कोषागार कार्यालयाची वार्षिंक तपासणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :आर्थिक वर्षाअखेरीच्या अनुषंगाने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नुसार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हा कोषागार कार्यालयास भेट देवून वार्षिंक तपासणी केली. यावेळी  जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील,परिविक्षाधीन जिल्हा कोषागार अधिकारी श्री.लिंगालोड, अपर कोषागार अधिकारी देविदास पाटील, उप कोषागार अधिकारी योगेश पगारे, रविंद्र भगत, लेखाधिकारी प्रकाश बनकर , अतुल ठाकुर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती. खत्री यांनी कोषागारातील सुरक्षा कक्षास भेट देवून उपलब्ध असलेला मुद्रांक साठा, जिल्ह्यातील एकूण शासकीय जमा व खर्चाबाबतची माहिती व तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. आर्थिक वर्षांअखेर असल्याने विविध शासकीय कार्यालयाकडून सादर होणाऱ्या देयकांचा निपटारा करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. तसेच...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest

शैक्षणिक

Latest

जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

नंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील जिजामाता शिक्षण संस्थेचे जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ( ८ मे २०२२) रोजी ” मराठी विज्ञानसाहित्य :– स्वरूप व्याप्ती व बदलते परिप्रेक्ष्य ” या नाविन्यपूर्ण विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे ऑफलाईन आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे हे करणार आहेत तर यावेळी ज्येष्ठ विज्ञानसाहित्याचे अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोले बीजभाषण करणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे राहणार आहेत.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील व शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.ए.आर. राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे, सचिव डॉ. अभिजीत दिलीपराव मोरे, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश वेडू देवरे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे हे चर्चासत्र चार सत्रात होणार आहे पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर फुला बागुल उपप्राचार्य एस पी डी एम महाविद्यालय शिरपूर हे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर सचिन गिरी नांदेड वंदना लव्हाळे जळगाव डॉक्टर युवराज पवार शिरपूर डॉक्टर सुरेश मालचे नाशिक यांचे निबंध वाचन होणार आहे दुसऱ्या सत्राच्या अध्यक्ष विज्ञान साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सुरेंद्र सुदर्शन दिवसे चंद्रपूर हे राहणार आहेत श्री संतोष पाटील शिरपूर दत्तात्रय शिंदे नाशिक डॉक्टर...

पावसाळ्यापूर्वीच आवश्यक धान्य व औषधांचा साठा करून ठेवावा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोसमी पावसाच्या आगमनास आता महिनाभराचा कालावधी राहिला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागासह सर्वच ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, अन्नधान्य व औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा करून ठेवावा. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करावा, 24 तास कार्यरत राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीद खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. गावनिहाय आराखडे तयार करावेत. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी स्वस्त धान्य वेळेत उपलब्ध होईल यासाठी आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवण्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची निगा राखावी. आपत्कालिन उपयोगासाठी पथके तयार ठेवावीत. वीज वितरण कंपनीने वीज वाहक तारांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व नगरपालिकांनी पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनचा किमान सहा महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करुन ठेवावा. गावांमध्ये जलशुद्धीकरणासाठी...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0150565
Visit Today : 105
error: Content is protected !!