Category: व्हिडीओ

Loading

[ditty_news_ticker id="624"]

क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे- सुनंदा पाटील

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना, युवक कल्याण योजना अशा क्रीडा विषयक अनुदान योजना राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. व्यायामशाळा विकास योजनेतंर्गत नवीन व्यायामशाळा बांधकाम करणे, व्यायामशाळा इमारत नूतनीकरण (15 वर्ष जूनी असल्यास), व्यायामशाळा साहित्य खरेदी व खुले व्यायामशाळा साहित्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा, आश्रमशाळा, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व शासकीय कार्यालयानी प्रस्ताव सादर करावे.यासाठी कमाल 7 लाख इतके अनुदान मंजूर करण्यात येते. क्रीडांगण विकास योजनेतंर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 ते 400 मीटर धावनपथ तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणात क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, चेंजींग रुम, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, भांडारगृह बांधणे, फल्ड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसनव्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था तयार करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिकलर यंत्रणा बसविणे, व मैदानावर रोलींगसाठी हँड मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबींसाठी 7 लाख रुपये कमाल मर्यादेत व क्रीडा साहित्य खरेदीसाठी 3 लक्ष अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी 100 टक्के अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व शासकीय शाळांनी प्रस्ताव सादर करावे. युवक कल्याण योजनेतंर्गत ग्रामीण, नागरी भागातील नोंदणीकृत युवक मंडळांना आर्थिक सहाय्य  तसेच नोंदणीकृत युवक मंडळांना स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबीरे, सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षण...

माजी सैनिकांच्या समस्या निवारणासाठी 9 जूनला मेळाव्याचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे व नंदुरबार तसेच स्टेशन हेडक्वार्टर देवळाली यांच्या संयुक्त विद्यमाने  धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवंलबित यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शुक्रवार 9 जून 2023 रोजी मेळाव्याचे आयेाजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.  या मेळाव्यात विविध रेकार्ड ऑफिसचे प्रतिनिधी, स्पर्श संदर्भातील अडचणीचे निवारण तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या विविध योजनांची माहिती, अग्निवीर भरती संदर्भातील माहिती तसेच  नेत्ररोग, नाक,कान, घसा, स्त्रीरोग, तसेच जनरल सर्जन तंज्ञ डॉक्टरामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवंलबितांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तरी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवलंबितांनी शुक्रवार 9 जून , 2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महासैनिक लॉन्स, धुळे येथे सकाळी 9 वाजता उपस्थित राहून मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. पाटील यांनी केले...

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 6 जून,2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून  20 जून,2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

देवरे विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल १००%

विखरण (प्रतिनिधी) – श्री.आप्पासाो.आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी.बोर्ड‌ परीक्षेचा निकाल १००% लागला असून विद्यालयातील १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह ,१२ विद्यार्थी प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाले.त्यातून केंद्रातून व विद्यालयातून प्रथम क्रमांक कु.नेहा विजय पाटील (९२%) ,द्वितीय चि.तेजस काशिनाथ पाटील व कु.हर्षदा संतोष पानपाटील (८९.४०%) ,तृतीय क्रमांक चि.भावीन किशोर बोरसे (८८.२०%),चतुर्थ क्रमांक कु.खुशबू रतीलाल पाटील (८८%) पाचव्या क्रमांकाने कु.भाग्यश्री ज्ञानेश्वर पाटील (८६.२०%) उत्तीर्ण झाली.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अनुसयाबाई देवरे,राजेंद्र देवरे, शैलजा देवरे,एस.ए.देवरे,एन.ए.देवरे व विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विखरण, नाशिंदा,खापरखेडा, बोराळा गावातील ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक...

शेती मातीचा होणार सन्मान; कांदा पिकाला मिळणार अनुदान

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): राज्यात साधारण 136.68 लाख मे.टन  कांद्याचे उत्पादन खरीप व रब्बी हंगामामध्ये घेण्यात येते. बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेले गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप व रब्बी हंगामातील कांदा काढला की लगेचच विकावा लागतो. कांद्याचे पिक निघाल्यावर मागणी नसल्यामुळे बाजारात कांद्याचे भाव पडतात. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याच्या बाजार भावातील चढ-उतार पासून सुरक्षा, स्थानिक बाजारपेठेत योग्य दरात पुरवठा व निर्यातीची मागणी भागविणेसाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने आता  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कांदे साठवण करण्यासाठी गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी 1 लाख 60 हजार 367 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा हा कंदवर्गात जिवंत राहून त्यांत मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे कांद्याचे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्यांचे 45-60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीतकमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांना कांदा साठवण गोदामासाठी रुंदी 3.90  मीटर लांबी 12.00 मीटर एकूण उंची 2.95 मीटर (जमीनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमानावर कांदाचाळ वैयक्तिक तसेच सामुदायीकरीत्या शेतकरी,गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ देण्यात येईल. असे असेल अनुदान कांदाचाळ संदर्भात मनुष्यदिन संख्या गृहीत धरुन आर्थिक मापदंड निश्चित करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत मनरेगाचे अनुज्ञेय अकुशल मजुरीचे दर रुपये 273 नुसार कांदाचाळ प्रकल्प उभारणीकरीता एकूण लागणारे मनुष्यदिन 352.45  नुसार 60 टक्के प्रमाणे 96 हजार 220 इतकी मजूरी तसेच साहित्यासाठी...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उप जिल्हाधिकारी कल्पना निळ- ठुबे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, नायब तहसीलदार  राजेंद्र चौधरी यांचेसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित...

Loading

‘लखपती किसान’ प्रकल्पामुळे आदिवासी भागातील स्थलांतर थांबेल; 6 हजार आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकल्पाच्या माध्यमातून समृद्धी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगांव तालुक्यात लखपती किसान प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील आदिवासींचे होणारे स्थलांतर थांबणार असून या दोन तालुक्यातील 6 हजार आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात या प्रकल्पातून समृद्धी येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज गव्हाळी (ता. अक्कलकुवा), कात्री (ता. धडगाव) येथे शासन आपल्या दारी मोहिमेत आदिवासी विकास विभाग, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या अर्थसहाय्याने युवा मित्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आयोजित लखपती किसान प्रकल्पाच्या लाभार्थी मेळाव्यात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार हिना गावित, आमदार आमशा पाडवी, नाबार्ड चे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील, युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे व पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी, लाभार्थी, शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, स्वत:ची जमीन, शेती असूनही मोठ्या प्रमाणावर येथील आदिवासी नागरिक रोजगारासाठी स्थलांतर करताना दिसत होते. ही बाब लक्षात घेवून या आदिवासी बांधवांना उपलब्ध साधन-संपत्तीवर रोजगार व अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी किसान मित्र प्रकल्पाची संकल्पना समोर आली. प्रायोगिक तत्वावर ही योजना सध्या गेल्या एक वर्षापासून धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात राबवली जात आहे. या दोन तालुक्यातून प्रत्येकी 3 हजार या प्रमाणे एकूण 6 हजार शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प राबवला जातो आहे. ते पुढे म्हणाले, तीन वर्ष चालणाऱ्या या प्रकल्पासाठी 15 कोटी रूपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमतून आदिवासी शेतकऱ्यांना शेळी पालन,वैयक्तिक विहिरी, सामुहिक विहिरी, सिंचन सुविधा, भाजीपाला बियाणे उपलब्ध करून दिले जाते. तसेच जलसंधारणाची कामे या माध्यमातून परिसरात...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!