Category: व्यापार उद्योग

राज्याच्या विकासात योगदान देण्याची तरुणांना संधी मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २मार्चपर्यंत अर्ज करावे – मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो. त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावतात. २०१५ ते २०२० या कालावधीत या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे. मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ करीता अर्ज करण्यासाठी वय २१ ते २६ वर्षे दरम्यान असावे. ६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव, असे किमान निकष आहेत. ऑनलाइन परीक्षा, निबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे फेलोंची निवड केली जाईल. आलेल्या अर्जांमधून ६० युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील. आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर हे या कार्यक्रमाचे संस्थात्मक भागीदार (ॲकॅडेमिक पार्टनर) आहेत. या दोन्ही संस्थांद्वारे सार्वजनिक धोरणासंबंधातील विविध विषयांचा अभ्यासक्रम फेलो पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांच्याकडून स्वतंत्र पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येईल. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची...

Read More

आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र भरण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग आस्थापना, व्यापारी, व्यावसायिक, कारखाने यांनी माहे ऑक्टोंबर 2022 ते माहे डिसेंबर,2022 या कालावधीत कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 दि.15 फेब्रुवारी,2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.  सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा 1959 अनुसार सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आस्थापनांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नियोक्ता या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती भरावी. माहिती न भरल्यास आस्थापनावर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, तळ मजला रुम नं.27, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564- 295801) येथे संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.रिसे यांनी कळविले...

Read More

नवउद्योजकांसाठी 13 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण शिबीर व स्पर्धेचे आयोजन

नंदुरबार, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : नवउद्योजकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रे अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धेचे 13 ऑक्टोंबर 2022 रोजी डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजीनिरिंग, शहादा येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकासाठी माहिती सत्र, स्थानिक उद्योजक तज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांचे सादरीकरण स्पर्धचे आयेाजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्या 25 हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उत्तम 10 कल्पनांची स्पर्धा तज्ञ समितीसमोर होणार असून राज्यस्तरावरील विजेत्यांना 1 लाख रुपयाचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळ पुरविण्यात येईल. तरी सर्व नवउद्योजक उमेदवारांनी आपल्या नवसंकल्पनाना मूर्त स्वरुप देवून सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in  किंवा www.mahastartupyatra.in  वर भेट द्यावी असे आवाहन  कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी केले...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!