नवरंग रेल्वे गेट ५ दिवस बंद
नंदुरबार(प्रतिनिधी) :- जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील नवापूर शहरजवळील नवरंग रेल्वे गेट (गेट नं ६९) वर दुरुस्तीचे काम करण्यासाठी दि. १० ते दि. १४ ऑगस्ट यादरम्यान या गेटवरील वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक कोळदे गावाजवळील गेट नंबर ७० च्या मार्गाने वळविण्याचे आदेश नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.नागपूर सुरत हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून जातो. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर लहान व अवजड वाहनांची रहदारी असते. अश्या या अत्यंत व्यस्त असलेल्या महामार्गावरील नवापूर शहराजवळील गेट नं 69 ( नवरंग गेट) च्या दुरुस्तीचे काम रेल्वेने हाती घेतले असून, त्यासाठी दि. १० ते १४ ऑगस्ट या कालावधीत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक चिंचपाडा कोळदा नवापूर यामार्गाने वळविण्यात आली असल्याचे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी कळविले असून, या भागातील वाहतुकीचे नियमन करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख श्री महेंद्र पंडित यांनी नवापूर व विसरवाडी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले...
Read More