Category: अजब

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘निसर्ग’ चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर  जिल्ह्यातदेखील येत्या 24 तासात पाऊस, अतिवृष्टी, तसेच जोराचे वादळवारे वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालयाकरीता निर्देश तालुक्यातील सर्व तहसिल कार्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावेत. या कक्षात महसूल, नगरपालिका, नगरपंचायत, पोलीस, आरोग्य, विज वितरण, कृषी विभागातील कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. नियंत्रण कक्षातून तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक,मंडल अधिकारी, कृषीसेवक यांच्याशी वेळोवेळी संपर्क करुन गावातील स्थितीचा आढावा घेण्यात यावा. याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षाला (दूरध्वनी क्रमांक 02564-210006) अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील सर्व आपात्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावीत. तालुक्यातील असुरक्षित घरांचा आढावा घेऊन तेथील नागरिकांना तात्काळ समाजमंदीर, शाळा किंवा गावातील सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात यावे. नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावामध्ये खबरदारी म्हणून घंटागाडी, दवंडीद्वारे, सोशल मिडीयाद्वारे नागरिकांना चक्रीवादळाच्या दृष्टीने सुरक्षेबाबत अवगत करावे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहावे. सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी परवानगी शिवाय आपले मुख्यालय सोडू नये. आरोग्य विभागातील ग्रामिण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आजपासून पुढील 24 तास कार्यरत राहतील. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वादळामुळे जिल्ह्यातील रस्ता खचणे, दरी कोसळणे व इतर अनुषंगीक घटनांची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत त्वरीत उपाययोजना कराव्यात. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वादळामुळे इलेक्ट्रीक पोल पडणे, व त्यावरील तारा तुटणे व इतर अनुषंगीक घटना लक्षात घेता तात्काळ उपाययोजना कराव्यात. चक्रीवादळादरम्यान मुख्य विद्युत जोडणी बंद करण्यात यावीत. संपर्क साधताना अडचण येऊ नये म्हणून सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी आपले भ्रमणध्वनी चार्ज करुन...

Read More
Loading

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – १२१२ 〇 🎵
═════ 🦋;🦋 ═════

जेव्हा एखादी व्यक्ती
त्यांच्या समस्या
आपल्यासमोर मांडते.
तेव्हा तो आपल्यावर
साक्षात देवासारखा
विश्वास ठेवते.
प्रयत्न करा तो विश्वास
तुटणार नाही..!
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
When someone
presents their
problems to us.
Then he believes
in us as God
Try not to lose faith !

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
मास्कचा नियमित वापर करा!
➖➖➖➖➖➖➖➖➖
२७ नोव्हेंबर
१८७०: इतिहास संशोधक
दत्तात्रय बळवंत
तथा द. ब. पारसनीस,
१८७८: कवि, समीक्षक
जतिंद्रमोहन बागची,
(मृत्यू: १ फेब्रुवारी १९४८)
१८८१: कायदेतज्ञ
डॉ. काशीप्रसाद जायस्वाल,
(मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७)
१८८८: लोकसभेचे पहिले सभापती
गणेश मावळंकर,
१९०७: विख्यात साहित्यिक
हरीवंशराय बच्चन,
(मृत्यू: १८ जानेवारी २००३)
१९१५: कथा, कादंबरीकार
दिगंबर बाळकृष्ण
उर्फ दी. बा. मोकाशी,
(मृत्यू: २९ जून १९८१)
१९५२: गायक-गीतकार
बॅप्पी लाहिरी,
१९८६: क्रिकेटपटू
सुरेश रैना
यांचा जन्मदिन !
१९५२: तत्वचिंतक
अहिताग्नी राजवाडे,
(जन्म: २३ ऑक्टोबर १८७९)
१९७६: पत्रकार. समीक्षक
ग. त्र्यं. माडखोलकर
(जन्म: २८ डिसेंबर १८९९)
१९७८: समाजसेविका
लक्ष्मीबाई केळकर,
(जन्म: ६ जुलै १९०५)
१९९४: स्वातंत्र्यसेनानी
दिगंबर विनायक
तथा नानासाहेब पुरोहित,
(जन्म: २८ मे १९०७)
१९९५: अभिनेता
संजय जोग,
२०००: साहित्यिक, संशोधक
बाळकृष्ण दत्तात्रेय
तथा बा. द. सातोस्कर,
(जन्म: २६ मार्च १९०९)
२००२: कवी
शिवमंगल सिंग सुमन,
(जन्म: ५ ऑगस्ट १९१५)
२००८: ७ वे पंतप्रधान
विश्वनाथ प्रताप सिंग
(जन्म: २५ जून १९३१)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0052052
Visit Today : 41
error: Content is protected !!