Author: Ramchandra Bari

रामभक्तांच्या प्रयत्नांनी सुखरूप आलो, मालसर येथे अडकलेल्या भाविकांनी केले अनुभव कथन

नंदुरबार (प्रतिनिधी) :- भगवंत आणि संत दगाजी बापू यांच्या आशीर्वादाने आणि सर्व रामभक्तांच्या प्रयत्नांनी आम्ही प्रचंड मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर आलो. ज्या ज्या रामभक्तांनी या संकट काळात आम्हाला मदत केली, त्या सर्वांचे शतशः आभार, अशी प्रतिक्रिया मालसर, जि. बडोदा येथे रामधून कार्यक्रमासाठी गेलेल्या भक्तांनी दिली. नर्मदेच्या पुरात अडकलेले भाविक श्री वाल्मीक तांबोळी व श्री भरत पटेल यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गेल्या 38 वर्षापासून चौपाळा येथील प. पू. ब्रम्ह. संत दगाजी महाराज यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली अखंड रामधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच प्रेरणेतून दरवर्षी श्रावण महिन्यात विविध तीर्थक्षेत्रांवर जाऊन राम व श्रीकृष्णाच्या नामजपाचा कार्यक्रम चौपाळा येथील...

Read More

विसरवाडी येथे पाककला स्पर्धा संपन्न

नंदुरबार (प्रतिनिधी):- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा सार्वजनिक हायस्कूल विसरवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.नवापूर पंचायत समितीचे उपसभस्पती श्री शिवाजी गावित यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. आर. बी. चौरे, विस्तार अधिकारी श्री रमेश देसले,श्री शीलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख विसरवाडी श्री पवार, केंद्रप्रमुख खांडबारा श्री सुनील सोनवणे, केंद्रप्रमुख श्रावणी श्री महेंद्र नाईक हे उपस्थित होते.निरीक्षक म्हणून श्रीमती पोर्णिमा, सारिका, फॅमिली गावित यांनी काम पाहिले. केंद्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभाग...

Read More

16 ऑक्टोबरपर्यंत राबविणार ‘सेवा महिना’; विशेष मोहिमांसह लोकाभिमुख उपक्रमांची करणार अंमलबजावणी – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार : (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यात 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत सेवा महिना राबविण्यात येणार असून, या ‘सेवा महिना’ कालावधीत  विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी व अंमलबजावणी  केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. दिली आहे. राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती प्राप्त करून देणे, नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी महिनाभर सेवा महिना हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे, असे श्रीमती खत्री यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा,...

Read More

मागेल त्याला मिळेल घर; कला-कौशल्यावर गुजराण करणाऱ्यांना देणार पुरक साहित्य – डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : (जिमाका वृत्तसेवा) – आदिवासी बांधवांसह जिल्ह्यातील प्रत्येक बांधवाला घरकुल देताना ‘मागेल त्याला मिळेल घर’ हे धोरण अवलंबले जाणार असून ग्रमीण आणि शहरी वाड्या, वस्त्यांमधील आपल्यातील विवध कला-कौशल्याच्या आधारावर गुजराण करणाऱ्या विविध पथकांना व्यवसायोपयोगी साहित्य देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.  ते आज शहादा येथील मीराप्रताप लॉन्स येथे आयोजित तालुक्यातील विविध वाड्यावस्तांमधील नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, माजी नगरसेवक प्रशांत निकम, विजय पाटील, शशिकांत पाटील हे उपस्थित...

Read More

नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर गावाला मिळाला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा विभाग स्तरावरील पुरस्कार

नंदुरबार : (जिमाका वृत्तसेवा) संत गाडगेबाबा सामान्य लोकात काम करणारे संत  होते. त्यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा जप केला. स्वच्छतेबाबत त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे विभाग स्तरावरील पुरस्काराचे वितरण प्रसंगी कार्यक्रमात केले. या पुरस्कारात नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर गावास विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. विभाग स्तरावर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन 2019-20 या वर्षासाठी एक व कोरोना कालावधी असल्याने सन 2020-21 2021-22 या दोन वर्षाची एक राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेचे पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त राधाकृष्ण...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!