Author: Ramchandra Bari

आदिवासी दिनानिमित्त रानाभाज्या महोत्सवाचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) –  जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार आणि प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाच्यावतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या शेतकरी प्रशिक्षण सभागृहात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, नवापूर पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.बी.भागेश्वर आदी उपस्थित होते.             रानभाज्या योग्य ब्रँडींग आणि मार्केटींग करून शहरी भागात पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.गावीत यांनी यावेळी सांगितले.             रानभाज्या महोत्सवाचा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमात सातत्य ठेवावे आणि अधिकाधीक नागरिकांपर्यंत या भाज्यांचे महत्व पोहोचवावे असे श्री.नाईक यांनी सांगितले.             कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस.बी....

Read More

नवरंग रेल्वे गेट ५ दिवस बंद

नंदुरबार(प्रतिनिधी) :- जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील नवापूर शहरजवळील नवरंग रेल्वे गेट (गेट नं ६९) वर दुरुस्तीचे काम करण्यासाठी दि. १० ते दि. १४ ऑगस्ट यादरम्यान या गेटवरील वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक कोळदे गावाजवळील गेट नंबर ७० च्या मार्गाने वळविण्याचे आदेश नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.नागपूर सुरत हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून जातो. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर लहान व अवजड वाहनांची रहदारी असते. अश्या या अत्यंत व्यस्त असलेल्या महामार्गावरील नवापूर शहराजवळील गेट नं 69 ( नवरंग गेट) च्या दुरुस्तीचे काम रेल्वेने हाती घेतले असून, त्यासाठी दि. १० ते १४ ऑगस्ट या कालावधीत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक चिंचपाडा कोळदा नवापूर यामार्गाने वळविण्यात आली असल्याचे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी कळविले असून, या भागातील वाहतुकीचे नियमन करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख श्री महेंद्र पंडित यांनी नवापूर व विसरवाडी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले...

Read More

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग यांच्या अधिपत्याखालील धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, अधिसूचित नदी-नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या खरीप हंगामासाठी 31 ऑगस्ट 2020  पर्यंत पाणी अर्ज सादर करायचे आहेत.           सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात.  मंजूरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल. टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज  क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल, असे  कार्यकारी अभियंता वि.र.दराडे यांनी कळविले...

Read More

जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी 9 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या एफएल-2, एफएल-3, सीएल-3,सीएल/एफएल/टीओडी-3 आणि एफएल/बीआर-2 अशा सर्व अनुज्ञप्त्या बंद करण्याचे आदेशित केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ची छाननी प्रक्रिया सुरू

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यासाठी 11 महिनाच्या कालावधीच्या ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ साठी 28 जुलैपर्यंत 4236 अर्ज प्राप्त झाले असून त्यातुन छाननी अंती 1065 उमेदवाराची निवड पहिल्या टप्प्यातील निवड प्रक्रीयेसाठी करण्यात आली आहे. छाननी प्रक्रीयेत बारावीत 60 टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच खेळ, वक्तृत्व-वादविवाद, सांस्कृतीक कार्यक्रम, कला, सामुदायिक सेवा, विद्यार्थी परिषदेचा प्रतिनिधी यापैकी कोणत्याही प्रकारात सहभाग नसलेल्या उमेदवारांची निवड पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसाठी करण्यात आलेली नाही.   पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांना  समिती सदस्यांच्या उपस्थितीत दूरध्वनीवरील समूह चर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीत सहभाग घेता येणार आहे.  विविध समिती सदस्यांद्वारे पहिल्या टप्प्यातील कार्यवाही करण्यात येत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 9804259150, 9811344573,7829099938 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले...

Read More

सुंदर विचार

☘☘

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – ११०२ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

प्रत्येक सकाळ म्हणजे
भूतकाळाच्या वलयातुन
बाहेर येऊन ,
भविष्य सुंदर करण्याची
सुवर्णसंधी होय !

➖➖➖➖➖➖➖➖➖
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
गर्दी टाळा, नियम पाळा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
६ ऑगस्ट
जागतिक
अण्वस्त्रविरोधी दिन !
अणुशस्त्र जागृती दिन !
१९२५: लेखिका
योगिनी जोगळेकर,
(मृत्यू: १ नोव्हेंबर २००५)
१९५९: पर्यावरणवादी
राजेंद्र सिंग,
१९६५: दिग्दर्शक
विशाल भारद्वाज,
१९७०: निर्माते, दिग्दर्शक
एम. नाईट श्यामलन,
यांचा जन्मदिवस !
१९२५: काँग्रेसचे एक
संस्थापक , राष्ट्रगुरू
सुरेंद्रनाथ बॅनर्जी,
(जन्म: १० नोव्हेंबर १८४८)
१९६५: संगीतकार
वसंत पवार,
१९९७: साहित्यिक
वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य,
(जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)
१९९९: काँग्रेसचे नेते
कल्पनाथ राय,
(जन्म: ४ जानेवारी १९४१)
२००१: नौदल प्रमुख
आधार कुमार चॅटर्जी,
२०१९: भाजपा नेत्या
सुषमा स्वराज
(जन्म: १४ फेब्रुवारी १९५२)
यांचा स्मृतिदिन !_
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0029638
Visit Today : 26
error: Content is protected !!