Author: Ramchandra Bari

सोयाबीनच्या स्वउत्पादित बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ग्रामबिजोत्पानातून स्वउत्पादित बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम 2020 मध्ये 20 हजार 990 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून खरीप हंगाम 2021 मध्ये 21 हजार 510 हेक्टरवर सोयाबीनचे पेरणी क्षेत्र निश्चित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये सोयाबीन बियाणाच्या विक्री केंद्रावर तुटवडा होण्याची शक्यता असल्याने कृषी आयुक्तालयाने ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सोयाबीन बियाणे ग्रामपातळीवरच उपलब्ध करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. कृषी विभागामार्फत गावोगावी माहिती देऊन ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमातुन सोयाबीन बियाणे प्रक्षेत्र भेटी, काढणी, मळणी, साठवणुकबाबत उत्पादक शेतकरी यांचेशी समन्वय आदी माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. तरी शेतकरी बांधवानी ग्रामबिजोत्पानातुन स्वउत्पादित सोयाबीन बियाणे पुढील खरीप हंगामासाठी साठवणूक करुन ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी केले...

Read More

मौजे पळाशी येथे 242 व्यक्तींची स्वॅब तपासणी

नंदुरबार – नंदुरबार तालुक्यातील मौजे पळाशी येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.आर.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना जनजागृती कार्यक्रमांतर्गत  घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणी शिबीरात 242 व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात आली. तालुका प्रशासनातर्फे सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच कोरोना संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी फिरत्या पथकाद्वारे अधिकाधिक स्वॅब तपासणीवर भर देण्यात येत आहे. पळाशी येथील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने फिरत्या पथकाद्वारे स्वॅब तपासणी करण्यात आली. डॉ.दिपाली पाडवी यांनी कुठल्याही प्रकारची विश्रांती न घेता 242 व्यक्तींचे स्वॅब घेतले. त्यांना डॉ.सतीश नांद्रे, डॉ.जितेंद्र सोनवणे, डॉ.योगेश पटेल, आरोग्य सेवक अमृता पाटील आणि श्री.खेडेकर यांनी सहकार्य...

Read More

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – ११२१ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन
सूचना देतात ते सामान्य
आणि
स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात
ते असामान्य !
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
It is normal to
give instructions to
the drowning people
from the shore
and it is unusual to
save them by risking
their own lives !

➖➖➖➖➖➖➖➖➖
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
सकस आहाराचे सेवन करा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
२८ ऑगस्ट
१८९६: उर्दू शायर
रघुपती सहाय
ऊर्फ फिराक गोरखपुरी,
(मृत्यू: ३ मार्च १९८२)
१९०६: रंगभूमी अभिनेते
चिंतामणी गोविंद
तथा मामा पेंडसे,
१९१८: प्रसिद्ध संगीतकार
राम कदम,
(मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
१९२८: पदार्थवैज्ञानिक
एम. जी. के. मेनन,
१९२८: सुप्रसिद्ध सतारवादक
उस्ताद विलायत खाँ,
(मृत्यू: १३ मार्च २००४)
१९३४: न्यायमूर्ती, राष्ट्रीय
मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा
सुजाता मनोहर,
१९६६: माजी खासदार
प्रिया दत्त
यांचा जन्मदिवस !
१६६७: जयपूर चे राजे
मिर्झाराजे जयसिंग,
(जन्म: १५ जुलै १६११)
१९६९: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत
रावसाहेब पटवर्धन,
२००१: लेखक, चित्रकार
व्यंकटेश माडगूळकर
(जन्म: ६ जुलै १९२७)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0038054
Visit Today : 188
error: Content is protected !!