Author: Amit Kapadne

काँग्रेसच्या सीमा वळवी बनल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा

विरोधी भाजपाने काँग्रेसला दिले समर्थन, हात उंचावून झालेले मतदान नंदुरबार (जगदीश ठाकुर)- नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सीमा पद्माकर वळवी यांना काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपानेही समर्थन दिल्यामुळे काँग्रेसच्या सीमा वळवी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. यावेळी विरोधी भाजपाच्या सर्व सदस्यांनी हात उंचावून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला...

Read More

नंदुरबार पालिका सभापतींची बिनविरोध निवड

बांधकाम समिती दीपक दिघे, महिला व बालकल्याण कल्याणी मराठे, शिक्षण ज्योती पाटील, पाणी पुरवठा कैलास पाटील व आरोग्य समितीत शारदा ढंडोरे नंदुरबार (जगदीश ठाकुर)- नंदुरबार नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. बांधकाम सभापतीपदी दीपक दिघे, महिला व बालकल्याण सभापतीपदी कल्याणी अर्जुन मराठे, शिक्षण सभापतीपदी ज्योती पाटील, पाणी पुरवठा सभापतीपदी कैलास पाटील तर आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शारदाबाई ढंडोरे यांची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार नगरपालिकेत विषय समिती सभापतींची एका वर्षांनी निवड करण्यात येते. मावळत्या सभापतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आज मंगळवारी नगरपालिकेत निवड निवड प्रक्रियेसाठी सभा घेण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्षा भारती राजपूत, मुख्याधिकारी भीमराव बिक्कड आदी उपस्थित होते. पाच विषय समितींच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. बांधकाम सभापतीपदी दीपक प्रभाकर दिघे, महिला व बालकल्याण सभापतीपदी कल्याणी अर्जुन मराठे, शिक्षण सभापतीपदी ज्योती पाटील, पाणीपुरवठा सभापतीपदी कैलास पाटील, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शारदाबाई प्रकाश ढंढोरे आणि स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी व व नियोजन सभापतीपदी उपनगराध्यक्षा भारती अशोक राजपूत यांची निवड झाली. यावेळी नवनियुक्त सभापतींचे अधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवकांनी कौतुक केले. तसेच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्षा भारती राजपूत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी नवनियुक्त सभापतींचा सत्कार केला. यावेळी निवडून आलेल्या सभापतींच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल-ताशांचा गजर करीत जल्लोष...

Read More

मिनी मंत्रालयासाठी भाजप- राष्ट्रवादीच गटबंधन

भाजपच्या गटनेतेपदी कुमुदिनी गावित यांची निवड नंदुरबार (जगदीश ठाकुर)- नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी भाजपाने निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे पक्षाची गट नोंदणी केली आहे. भाजपाच्या पक्ष गटनेतेपदी डॉ. कुमिदिनी विजयकुमार गावित यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. भाजपाकडे नंदुरबार जिल्हा परिषदेत 23 सदस्यांचे संख्याबळ असून गट नोंदणी वेळी राष्ट्रवादीचे तीन सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता भाजप व राष्ट्रवादीचे गटबंधन झाल असून भाजपाच सदस्य संख्याबळ 26 झाला आहे. पक्ष नोंदणी प्रसंगी भाजपच्या खा. डॉ. हिना गावित, आ. डॉ. विजयकुमार गावित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार शरद गावित यांच्यासह भाजपाचे 23 व राष्ट्रवादीचे तीन असे 26 सदस्यांची नोंदणी भाजपाने केली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपाला समान 23 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला सात, राष्ट्रवादीला तीन जागा झाले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात रंगलेल्या सत्तासंघर्षाचे नाट्य नंदुरबारातही आता मिनी मंत्रालयासाठी रंगल आहे. असे असले तरी दि.17 जानेवारीपर्यंत नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची मुदत आहे. त्यामुळे आता नंदुरबार जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता स्थापन होईल? याकडे नंदुरबार जिल्ह्यासह राज्याच्या लक्ष लागून...

Read More

क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगून महिलेला गंडविले

दोन तोतया पोलिसांनी सव्वा लाखाचे दागिने लांबविले नंदुरबार (जगदीश ठाकुर)- क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगून दोन तोतया पोलिसांनी एका महिलेकडील कापडी पर्स हातचलाखीने लांबवून सुमारे सव्वा लाखाचे दागिने चोरुन नेले. या दोघांनी हिंदी भाषेत संवाद साधून महिलेला गंडविले आहे. याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नंदुरबार येथील वेडूगोविंद नगरात राहणारी हेमलता मगनलाल जयस्वाल ही महिला कापडी पर्समध्ये दागिने घेवून जात होती. यावेळी शहरातील भगवा चौक परिसरात रेल्वे पटरीजवळ दोन अज्ञातांनी तिच्या जवळ येवून आम्ही क्राईम ब्रॉचचे पोलीस असल्याचे सांगितले. तसेच सदर महिलेची नजर चुकवून कापडी पर्स हातचलाखीने चोरुन नेली. यात तब्बल सव्वा लाख रुपयांचे दागिने होते. चोरट्यांनी महिलेशी हिंदी भाषेत संवाद साधला होता. घटनास्थळी उपनगरचे पोलीस निरीक्षक भापकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी भेट दिली. याबाबत हेमलता जयस्वाल या महिलेने नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करीत...

Read More

जी.टी.पाटील महाविद्यालयात “काव्यवाचन”

नंदुरबार- मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयक जागृती व्हावी या उद्देशाने जी.टी.पाटील महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” यानिमित्ताने काव्यवाचन उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी यांनी अध्यक्षीय भाषणातून पाणी, पर्यावरण या विषयावर कविता सादर करून, विद्यार्थ्यांना “पाणी अडवणे व जिरवण्याची आवश्यकता असल्याचा संदेश दिला. तसेच या काव्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत काव्यवाचन कार्यक्रमातून प्रतिभावान कलावंतांना संधी मिळून, ते स्वतःला घडवत असतात, म्हणून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने व्हावेत अशा प्रकारचा विचार मांडला. काव्यवाचन कार्यक्रमात समाधान वाघ, कमलेश महाले, दीप पाटील, दर्शन भावसार, गौरव पुंडे, मंदाराणी सूर्यवंशी, रोशनी कोकणी, कासिम पठाण कल्याणी कळकटे रोहिणी कोकणी, शुभम सोनार, प्रतिक कदम या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन सादर करत त्यांनी प्रेमविषयक, सामाजिक, राष्ट्रप्रेमविषयक या विषयीच्या भावना, जाणिवा यांचा उत्स्फूर्तपणे आविष्कार केला. त्यांच्या काव्याच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी मोठ्या उत्साहाने दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.माधव कदम यांनी हसतखेळत, विनोदाची उधळण करत केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश अर्जुन भामरे, डॉ. विजया पाटील, डॉ. सुलतान पवार, डॉ. मनोज शेवाळे, प्रा.एन.आर.कोळपकर, प्रा. शुभांगी देवकर, प्रा.महेंद्र गावित, प्रा. जितेंद्र पाटील आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!