नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात चालवित असलेल्या  वृद्धाश्रम संस्थांनी त्यांची माहिती  21 जून 2022 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,‍ जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या कार्यालयात सादर करावी. सदर वृद्धाश्रमांची माहिती शासनास सादर करण्यात येणार असून या माहितीच्या आधारे नोंदणीकृत वृद्धाश्रमांना भविष्यात विविध योजनांचा लाभ देणे यामुळे शक्य होणार आहे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगांवकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.