नंदुरबार- (जगदीश ठाकुर)-
नंदुरबार तालुक्यातील पातोंडा व गण आणि कोळदे गटात भाजपाचा झेंडा फडकला आहे. पातोंडा गटातून भाजपाच्या विजया प्रकाश गावित या विजयी झाल्या आहेत. तर पातोंडा गणातून भाजपाच्या लताबेन पाटील या 878 मतांनी विजयी झाले आहेत. मतमोजणी परिसराच्या बाहेर भाजपाच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत आहे तसेच नंदुरबार तालुक्यातील कोळदे गटातील भाजपाचे उमेदवार योगिनी अमोल भारती या 301 मतांनी विजया झाल्या आहेत.