नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम आणि  थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी तंत्रशिक्षण संचानालयातर्फे शैक्षणिक  वर्षे 2020-21 करिता प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी ऑनलाईन विकल्प अर्ज भरणे अनिवार्य आहे . शासकीय तंत्रनिकेतन, नंदुरबार येथे संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. 12 डिसेंबर ते  14 डिसेंबर 2020  दरम्यान कॅप प्रथम फेरीसाठी ऑनलाईन विकल्प नमुना करण्यात येऊन त्यास निश्चित करावयाचा आहे.  16 डिसेंबर रोजी कॅप प्रथम फेरीसाठी तात्पुरते जागा वाटप प्रदर्शित करावयाचे आहे. 17 व 18 डिसेंबर रोजी कॅप प्रथम फेरी साठी वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवाराने स्वतःच्या लॉगइनद्वारे  अर्ज स्विकृत करावयाचा आहे, तर 17 ते 19 डिसेंबर सायं.5 वाजेपर्यंत या कालावधीत कॅप प्रथम फेरी साठी वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहून कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येईल.

कॅप दुसऱ्या फेरी साठी रिक्त जागा 20 डिसेंबर 2020 रोजी  प्रदर्शित करण्यात येतील. 21 व 22 डिसेंबर रोजी कॅप प्रथम फेरी साठी वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवाराने स्वतःच्या लॉगइनद्वारे  अर्ज स्विकृत करावयाचा आहे. कॅप दुसऱ्या फेरी साठी तात्पुरती जागा वाटप 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येईल, वाटप करण्यात आलेल्या जागेची स्विकृती उमेदवाराने 25 ते 28 डिसेंबर 2020 पर्यंत द्यावयाची आहे. 25 ते 29 डिसेंबर सायं.5 वाजेपर्यंत या कालावधीत कॅप प्रथम फेरी साठी वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहून कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येईल.

शासकीय तंत्र निकेतन नंदुरबार या संस्थेत विकल्प अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन व  विनामुल्य सुविधा 12 डिसेंबर 2020 ते 14 डिसेंबर 2020 या कालावधीत सुरू असेल. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे  आवाहन प्राचार्य शासकीय तंत्र निकेतन नंदुरबार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9960864693या क्रमांकावर संपर्क साधावा.