नंदुरबार (प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला नंदुरबार मधुन उत्सुर्त प्रतिसाद मिळाला आहे. लोकांनी नऊ वाजता आपल्या घराच्या लाईट बंद करत दिवे प्रज्वलीत केले. नंतर घराच्या छतावर जात मोबाईलचे टॉर्च देखील सुरु केल्याचे चित्र दिसुन आले. विशेष म्हणजे या साऱया मोहीमेत बंदोबस्तात असलेले पोलीस कर्मचारी देखील सहभागी झाल्याचे चित्र दिसुन आले. बंदोबस्तातुन वेळ काढत आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरु करत महिला पोलीस कर्मचाऱयांसह पोलींसांनी देखील या मोहीमेला पाठबळ दिल्याचे चित्र दिसुन आले.