नंदुरबार (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात आज कोरोनाने नवा विक्रम केला असून तब्बल ६६ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. दिवसेंदिवस कोरोणा विषाणुचा विळखा जिल्ह्यात वाढतांना दिसुन येत आहे.  आता जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा हा ७१८ वर पोहचला आहे. यातील ३९ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून ४०७ जण उपचारानंतर संसर्गमुक्त होवुन घरी परतले आहेत. २४८ जणांवर उपचार सुरु आहे.

आज आढळून आलेल्या एकूण 66 रुग्णांमध्ये शहादा तालुक्यातील सारंगखेडा ८ रुग्ण ( 55पुरुष, 61पुरुष, 4पुरुष, 30महिला, 50पुरुष, 62 पुरुष, 51महिला, 23महिला), परीमल कॉलनी, शहादा १ रुग्ण (41 पुरुष), सोनार गल्ली, शहादा १ रुग्ण (70महिला), ब्राह्मणपूरी ता.शहादा १ रुग्ण (22महिला), कोविड केअर सेंटर, मोहिदे शहादा १ रुग्ण (32पुरुष), सालदार नगर, शहादा १ रुग्ण (47महिला), सिद्धार्थ नगर, शहादा १ रुग्ण (51पुरुष) अशा १४ रुग्णांचा समावेश आहे.

तर नंदुरबार तालुक्यातील तलवाडे, ता.नंदुरबार २ रुग्ण (42 पुरुष, 35 महिला), शनिमांडळ, ता.नंदुरबार 4 रुग्ण (28 पुरुष, 50महिला, 42 महिला, 42 महिला), विखरण, ता.नंदुरबार १ रुग्ण (55पुरुष), खोंडामळी, ता.नंदुरबार ७ रुग्ण (45महिला, 55 महिला, 35 महिला, 2 पुरुष, 8 पुरुष, 40 पुरुष, 49 पुरुष) विलगीकरण कक्ष, नंदुरबार 4 रुग्ण (28महिला, 6महिला, 4पुरुष, 31पुरुष), कुंभारवाडा, देसाईपूरा नंदुरबार १४ रुग्ण (62महिला, 6महिला, 10महिला, 32महिला, 42पुरुष, 6पुरुष, 33महिला, 3महिला, 5महिला, 44पुरुष, 20पुरुष, 26पुरुष, 47महिला, 70महिला) बाहेरपूरा, नंदुरबार १ रुग्ण (30पुरुष), रघुकूल नगर,  नंदुरबार ३ रुग्ण  (12पुरुष, 43पुरुष, 38महिला), करजकुपा,  ता.नंदुरबार 4 रुग्ण (40महिला, 21महिला, 7पुरुष, 23पुरुष), भाग्योदय नगर, नंदुरबार 4 रुग्ण (1महिला, 10महिला, 22महिला, 80महिला), साक्री नाका, नंदुरबार १ रुग्ण (19महिला), नळवा रोड, नंदुरबार १ रुग्ण (34पुरुष), नवापूर रोड, नंदुरबार १ रुग्ण (47पुरुष), शनिमांडळ, ता.नंदुरबार १ रुग्ण (75पुरुष), माळी गल्ली, रनाळा १ रुग्ण (54पुरुष), एलीझा नगर, धुळे रोड, नंदुरबार १ रुग्ण (49पुरुष), कमलकुंज नगर, नळवा रोड, नंदुरबार १ रुग्ण (60पुरुष) अशा ५१ रुग्णांचा समावेश आहे. तसेच तळोदा तालुक्यातील भोई गल्ली, तळोदा (36पुरुष) या एका रुग्णाचा समावेश आहे.


जिल्ह्यात आतापर्यत ४५०३ जणांचे  नमुऩे तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आलेले होते. यातील ३५६३ अहवाल निगेटीव्ह आले असून २२२ अहवाल प्रलंबीत आहेत. या आठवड्यामध्ये कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असून, या आठवड्याभरातच सुमारे १७० नव्या कोरोणा विषाणु बाधीतांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे नागरीकांनी अधिक जागृत राहुन कुठलेही लक्षण आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन केले जात आहे.