खोंडामळी – श्री.आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन विखरण गावाचे ग्रा.पं.चे सरपंच श्रीम.छायाबाई बापू पाटील, पोलिस पाटील दिपमाला प्रकाश पाटील,ग्रा.पं.सदस्या निर्मलाबाई रोहिदास साळुंके, मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान, खरेदी -विक्री,नफा,तोटा ज्ञान,वस्तूची गुणवत्ता व ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा.या उद्देशाने आयोजित बाल आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने साकारण्यात आली होती.
विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेले, आपल्या पालकांच्या मदतीने बनविलेले पदार्थांत नाश्ता,चायनीज पदार्थ,गोड पदार्थ,अशा विविध पदार्थांचे स्टॉल्स् लावण्यात आले होते.विद्यार्थी, पालक,शिक्षक शिक्षकेतर वृंदानी विविध खाद्यपदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे कौतुक केले.
बालआनंद मेळावा यशस्वीतेसाठी श्रीम.एस.एच. गायकवाड, डी.बी.भारती,के.पी.देवरे, एम.डी.नेरकर,वाय.डी.बागुल,व्ही.बी. अहीरे,आर.एम.पाटील, श्रीम.एम.आर.भामरे,एस‌.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.