विखरण (प्रतिनिधी) – श्री.आप्पासाो.आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी.बोर्ड‌ परीक्षेचा निकाल १००% लागला असून विद्यालयातील १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह ,१२ विद्यार्थी प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाले.त्यातून केंद्रातून व विद्यालयातून प्रथम क्रमांक कु.नेहा विजय पाटील (९२%) ,द्वितीय चि.तेजस काशिनाथ पाटील व कु.हर्षदा संतोष पानपाटील (८९.४०%) ,तृतीय क्रमांक चि.भावीन किशोर बोरसे (८८.२०%),चतुर्थ क्रमांक कु.खुशबू रतीलाल पाटील (८८%) पाचव्या क्रमांकाने कु.भाग्यश्री ज्ञानेश्वर पाटील (८६.२०%) उत्तीर्ण झाली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अनुसयाबाई देवरे,राजेंद्र देवरे, शैलजा देवरे,एस.ए.देवरे,एन.ए.देवरे व विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विखरण, नाशिंदा,खापरखेडा, बोराळा गावातील ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.