नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी दुकाने आणि बाजार खुले ठेवण्यास दोन तास वाढवून देण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशीत केले आहे.

जिल्ह्यातील कन्टेन्टमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने 9 जुलै 2020 पासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. पूर्वीच्या आदेशात नमूद सर्व सुचनांचे पालन दुकान किंवा संबंधित आस्थापना मालकांनी करणे आवश्यक आहे. मिशन‍ बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यांतर्गत हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. दुकानातील गर्दी कमी करण्यासाठी दुकान मालक या वाढलेल्या कालावधीचा उपयोग करू शकतील.