नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी 28 ऑगस्ट 2020 रोजी गणेश विसर्जनाच्या 7 व्या दिवशी संपूर्ण दिवस किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या एफएल-2, एफएल-3, सीएल-3,सीएल/एफएल/टीओडी-3 आणि एफएल/बीआर-2 अशा सर्व अनुज्ञप्त्या बंद करण्याचे आदेशित केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.