कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता गृह विलगीकरणाची सुविधा त्वरीत बंद करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील.

आरोग्य यंत्रणेने स्वॅब संकलन पथकांची संख्या वाढवावी. कोरोना बाधित आढळलेल्या गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावात सर्वेक्षण करावे आणि त्यानुसार फिरत्या पथकाने त्वरीत त्याठिकाणी जाऊन स्वॅब संकलन करावे. सिटी स्कॅन सुविधा असलेल्या रुग्णालयांना निमोनियाच्या रुग्णांची माहिती प्रशानाला देण्याचे निर्देश देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणेकडील नादुरुस्त रुग्णवाहिका दुरुस्त करण्यासाठी माहिती घेऊन प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य डॉ.राजेश वसावे, डॉ.रोशन भंडारी, डॉ.किरण जगदेव, डॉ.गौरव तांबोळी, डॉ.पंकज चौधरी, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.जयेश जैन, डॉ.राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.