नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालयातर्फे गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे आणि सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना आहे.

ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि जागतिक स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.  

योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्डकप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळ प्रकार) स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त, गुणवंत खेळाडूस मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच 30 वर्षे किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख यापैकी नंतरच्या दिवसापासून पेन्शन देय असेल आणि त्याच्या,तिच्या आयुष्या दरम्यान कायम राहील, परंतु अशी पेन्शन लागू करतांना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झाले असतील.

ऑलिम्पिक किंवा पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील प्राविण्य धारक खेळाडूस 20 हजार, सुवर्ण पदक विश्वचषक किंवा विश्व अजिक्यपदस्पर्धेसाठी (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) 16 हजार, रौप्य व कास्य पदक विश्व चषक स्पर्धेसाठी (ऑलिम्पिंक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार 14 हजार,  कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅराएशियन गेम्समध्ये सुवर्ण पदकासाठी 14 हजार आणि कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅराएशियन गेम्समधील रौप्य व कास्य पदकासाठी 12 हजार रुपये दरमाह मानधन रक्कम असेल.

दर चार वर्षानी आयोजित होणाऱ्या विश्वचषक / विश्व अजिक्यं पदस्पर्धाकरिता सदरची योजना लागू राहील.  याबाबत संबधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्याकागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा आहे.

विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळसंघटनेचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव अथवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरी आवश्यक आहे.  याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे. https://www.yas.nic.in/sports/scheme-sport-fund-pension-meritorious-sportspersons राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.