प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र गिरासे व शिवसेनेचे विजयी उमेदवार रामबाबू यांची गळाभेट

नंदूरबार (जगदीश ठाकुर)-
नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नंदुरबार तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या कोपर्ली गटातून शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी 3 हजार 325 मतांनी विजय झाले आहेत. या गटातील त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार रवींद्र गिरासे यांचा पराभव झाला आहे. या गटात माजी आमदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र राम रघुवंशी हे शिवसेनेकडून तर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे खंदे समर्थक रवींद्र गिरासे हे भाजपाकडून निवडणूक लढवित होते. त्यामुळे या गटात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती
कोपर्ली गटाचा निकाल लागतात विजयी झालेले राम चंद्रकांत रघुवंशी व पराभूत उमेदवार रवींद्र गिरासे यांनी मतमोजणी केंद्र परिसरात एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी रवींद्र गिरासे यांनी राम रघुवंशी यांचे विजयी झाल्याबद्दल कौतुक केले.