नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय सांख्य‍िकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्य‍िकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. या वेब पोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  29 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10.30 वा. ऑनलाईन करण्यात येणार आहे, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.