नंदुरबार (प्रतिनिधी):- शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात दुकाने सुरु ठेवणाऱ्या १० दुकानदारांना न्यायालयाने तब्बल ४२ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी व नियंत्रण आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे आदेश पारीत केलेले असतांना व पुढील आदेशापावेतो दुकाने सुरु ठेवणार नाही, असे आदेश दिलेले आहेत, असे माहिती असतांना देखील दुकाने सुरु ठेवुन प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करतांना दि .१९ मे २०२० रोजी महसुल, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, नंदुरबार शहर पोलीस यांचे संयुक्त कारवाईत १९ दुकानांत मालक व कामगार मिळुन आले होते.
या कारवाईत बॉम्बे ट्रेडर्स, ओम शांती मॅचिंग, आनंद गिफ्ट हाऊस, मोदी हॅण्डलुम, अंबर मॅचिंग, अरीहत कलेक्शन, सिध्दार्थ सिलेक्शन, कुशल कलेक्शन, बालाजी साडी आणि जगदंबा कलेक्शन ही दुकाने प्रतिबंधीत क्षेत्रात सुरु असल्याचे आढळुन आले होते. त्यांच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस टाणेत भा.द.वि.क .१८८, २६८, २६९, २९०, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील दुकान मालक व त्यात काम करणारे आरोपी बॉम्बे ट्रेडर्स मधील विनोद चंदरमल मंदाणा, (मालक) विक्रम बजाज, सतिष माळी, गोपाल बागले, हर्षल परदेशी, अनिल वासवाणी, शंकर मंदाणा, आनंद गिफ्ट मधील राम गुरुबक्षाणी, ओमशांती मॅचिंग मधील अशोक जैन (मालक), बालाजी साडी व जगदंबा कलेक्शन मधील शंकर हरगुनदास तररेजा, रोहीत शत्रुघ्न गेही, आदनेश किरण सौपुरे, दलपतसिंह सवाईसिंह राजपुत, गुलाबसिंह सवाईसिंह राजपुत आणि मोदी हॅण्डलुम, अंबर मॅचिंग, अरीहंत कलेक्शन, सिध्दार्थ सिलेक्शन, कुशल कलेक्शन मधील कुंदन मोहनलाल कटारीया, सोनलकुमार विपीनचंद्र वाणी, विशाल मोतीराम शिंदे, गीतमचंद पुखराज जैन, सिध्दार्थ गौतमचंद जैन, सुनिलकुमार शंकरलाल देसरडा, शैलेश नरेंद्र जैन यांचा समावेश होता.
त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस . ए . विराणी यांच्या न्यायालयात हजर केल्याने प्रत्येकी रुपये २००० / – दंड असा एकुण रुपये ४२ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा दिली आहे.
या आरोपीतांविरुध्द गुन्हयाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणारे पैरवी अधिकारी पोना गिरीष पाटील, नंदुरबार शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि तपास अधिकारी पोना सुनिल येलवे यांचे पोलीस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत व अपर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी यांनी अभिनंदन केले आहे.