नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्ह्यातील 02-शहादा (अ.ज) विधानसभा मतदार संघातील नावात बदल करण्याचा प्रस्ताव व मतदान केंद्रात बदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

मतदान केंद्राच्या नावात बदल करण्याचा प्रस्तावीत यादीत 02-शहादा (अ.ज) विधानसभा मतदार संघातील 79 नवलपूर मतदान केंद्राच्या नावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत खोली नं.1 नवलपूर असा बदल करण्यात आला आहे.

तसेच 02-शहादा (अ.ज) विधानसभा मतदार संघातील 3-कोटबांधणी (नागझिरी) मतदान केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागझिरी पुर्व इमारत , 175- शहादा, वसंतराव नाईक हायस्कुल शहादा उत्तरेकडून पूर्व-पश्चिम इमारत पुर्वकडून खोली क्र. 2 (महिला कक्ष ), 179- शहादा शारदा कन्या विद्या मंदिर शहादा पुर्वेकडून उत्तर-दक्षिण खोली क्र.2, 199- शहादा नगर पालिका प्राथमिक न्यू इंग्लिश स्कूल, पूर्वकडील उत्तर दक्षिण इमारत उत्तरेकडुन खोली क्र.2 शहादा या नवीन केंद्रांना मान्यता देण्यात आल्याचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.