नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): समस्याग्रस्त व पीडीत महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 20 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून तक्रारदार महिलांनी लोकशाही दिनात प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज wcdnandurbar@gmail.com  या ईमेलवर किंवा 9420372067 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 20 जुलै  रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविण्यात यावेत.  

सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी,अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,रुम नंबर 226, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,टोकरतलाव रोड,नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047) येथे संपर्क साधावा, असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार यांनी कळविले आहे.