नंदुरबार (प्रतिनिधी) – मे रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्त धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे नवापूर चौफुली भागातील गरजू व्यक्तींना अन्नधान्य वाटप करण्यात आले. देशात कोरोना विषाणुचे संकट लक्षात घेता संपूर्ण देशात अहिल्याबाई होळकर जयंती अत्यंत साधेपणाने मात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्याबाई होळकर अत्यंत दानधर्मी, प्रजावत्सल व लोककल्याणकारी शासनकर्त्या होत्या. त्यांच्या सेवाभावी व दानधर्मी या गुणांचा आदर्श घेत धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे शहरातील नवापूर चौफुली भागातील गरीब गरजू लोकांना धान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेशाध्यक्षा धनश्री आजगे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर धनगर, योगेश बोरसे, लक्ष्मण धनगर, प्रकाश धनगर, किसन धनगर, मुकेश आजगे, प्रमोद रजाळे, उज्वल धनगर, दिपक धनगर, विकास बोरसे, मनोज महाले, भुषण महाले आदी समाज बांधव उपस्थित होते.