नंदुरबार (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 295 जयंतीचे औचित्य साधत आज नंदुरबारमध्ये आयोजीत रक्तदान शिबिरात तब्बल 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना व कर्मचारी संगठना तसेच अहिल्या वाहिनी नंदूरबार जिल्हा यांच्यातर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधवांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिर प्रसंगी धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्ष आनंदा कुंवर, मल्हार सेना जिल्हाध्यक्ष कन्हैयालाल भिमराव धनगर, खासदार डॉ हिनाताई गावित, आमदार डॉ विजय कुमार गावित जिल्हापरिषद उपाध्यक्ष रामभैय्या रघुवंशी, सागर तांबोळी, विरेंद्र अहीरे, आदिवासी क्रांती दल जिल्हाध्यक्ष प्रवीण बागूल,  दीपक धनगर तसेच श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन चे जीवन माळी, रामकृष्ण पाटील, अरुण साळुंखे,महेंद्र झंवर, अजय देवरे. हितेश कासार. आकीब धोबी उपस्थित होते