नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी हे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            शनिवार 4 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता मुंबई येथून नंदुरबारकडे प्रयाण व नंदुरबार येथे मुक्काम.

रविवार 5 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता नंदुरबार येथून असली ता.धडगावकडे प्रयाण व असली येथे राखीव. रात्री 10 वाजता असली येथून नंदुरबारकडे प्रयाण व नंदुरबार येथे मुक्काम.

            सोमवार 6 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हास्तरीय वनहक्क समिती सदस्य व लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांचे समवेत बैठक (स्थळ- पालकमंत्री निवासस्थान, विजयश्री नगर,शासकीय तंत्रनिकेतनच्या पुढे, नंदुरबार ) दुपारी 3 वाजता  नंदुरबार येथून शिंदखेडा जि.धुळे कडे प्रयाण.4 वाजता शिंदखेडा येथे खावटी अनुदान योजना अंतर्गत खावटी किट वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता शिंदखेडा येथून नंदुरबारकडे प्रयाण व नंदुरबार येथे मुक्काम.

            मंगळवार 7 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांसोबत बैठक (स्थळ- पालकमंत्री निवासस्थान, विजयश्री नगर, शासकीय तंत्रनिकेतनच्या पुढे, नंदुरबार) सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे पिक परिस्थिती, कुपोषण व रोजगार या विषयाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. व सायंकाळी 6 वाजता नंदुरबार येथून मुंबईकडे प्रयाण.