नंदुरबार जिल्ह्यातुन आज दिलासा दायक बातमी मिळाली असुन पहिल्या चार कोरोणा बाधीतांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात एका ७१ वर्षीय आजी बाईचा समावेश असुन एकाच कुटुंबातील असलेल्या या चारही जणांनी उपचाराबाबत समाधान व्यक्त केले आहे. इतकच नव्हे तर कोरोणावर मात करणाऱया या चारही जनांनी गरज भासल्यास आपला प्लाझमा देखील देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. १७ तारखेला नंदुरबार शहरातील अलीसाहब मोहल्ला मधील एकाचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता आणि त्यांनतंर त्याच्या संपर्कातील आणखीन तीन कुटुंबीय देखील पॉझीटीव्ह आले होते. दरम्यान जिल्ह्यातील १९ कोरोणा बाधीतांपैकी एकाचा मृत्यु झाला असुन आता चार जण उपचार घेवुन घरी परतल्याने उपचार घेणाऱया कोरोणा बाधीतांची संख्या आता १४ इतकी राहीली आहे.