नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात 18 नोव्हेंबर 2021 रोजी वादळीवारा (ताशी 40 ते 50 कि.मी ), विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झाली आहे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी  शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवुन ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर मालाचे नुकसान होणार नाही अशी काळजी घ्यावी. विजा, गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, झाडाखाली, वीज वाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.