नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारद्वारा  सन 2021-2022 या वर्षांसाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार  जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, गौरवपत्र व  दहा हजार रुपये रोख स्वरुपात देण्यात येणार आहे.

सन 2021-2020 वर्षांसाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार म्हणून श्रीराम अरुण मोडक तर गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष ) म्हणून परिक्षित प्रगतीचंद्र बोरसे ,गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला) हर्षदा शिवदा पाडवी तर गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कार म्हणून कालीदास वरतु वसावे यांना देण्यात येणार आहे. सदर पुरस्कार कोविड नियमान्वये नंतर प्रदान करण्यात येणार आहे. असे  जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.