नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यात कोरोणा विषाणु बाधीतांच्या रुग्णांच्या संख्येने आता जोर धरला असुन जिल्ह्यातील कोरोणा बाधीतांची संख्येने शंभरी पार केली आहे. आज जिल्ह्यातील तब्बल १३ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोणा बाधीतांची संख्या ही १०२ वर पोहचली आहे. यातील ५२ जण हे उपचार घेवुन परतले असुन ४२ जणांवर जिल्हा सामांन्य रुग्णालयात तर दोघांवर धुळे येथे उपचार सुरु आहे. तर यातील ०६ जणांचा मृत्यु झाला आहे. आज सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोरोणा वॉरियर्स असणारे जिल्हा सामान्य रुग्णालयातील तब्बल ०८ कर्मचाऱयांचा अहवाल हे पॉझीटीव्ह आले आहे. गेल्या पंधरा दिवसात तब्बल ६२ नवे कोरोणा बाधीत रुग्ण आढळुन आल्याने ही जिल्ह्यासाठी आता खऱया अर्थाने धोक्याची घंटा मानली जात आहे.