नंदुरबार :- येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु. सीमा वळवी व त्यांचे वडील माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी या दोघांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये प्रत्येकी एक लक्ष रुपये रक्कमेचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु. सीमा वळवी यांनी त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य मानधनाच्या रकमेतून एक लक्ष रुपये एवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याबरोबरच त्यांचे वडील माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनीदेखील यांच्या मानधनातून एक लक्ष रुपये एवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे. देश संकटात असतांना प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने देशसेवा, समाजसेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड ज्यांच्याकडे सुपूर्द केल्याचे यावेळी माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी सांगितले.