नंदुरबार :- जिल्ह्यात आज आणखीन 06 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले असून, दिवसेंदिवस कोरोणा विषाणुचा विळखा जिल्ह्यात वाढतांना दिसुन येत आहे.  आता जिल्ह्यातील कोरोणा बाधीतांचा आकडा हा १६३ वर पोहचला आहे. यातील ०६ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून जवळपास ७० जण उपचारानंतर संसर्गमुक्त होवुन घरी परतले आहेत.


आज आलेल्या अहवालांमध्ये नंदुरबार शहरातील साईबाबा नगर कोकणी हिल येथील ३७ वर्षीय पुरुष, वृदांवन कॉलनीतील ५० वर्षीय महिला,  सिद्धीविनायक चौकातील २८ वर्षीय महिला, तालुक्यातील धुळवद येथील ४७ वर्षीय पुरुष तर तळोदा शहरातल्या खांन्देश गल्लीतील ५३ वर्षीय पुरुष आणि शहाद्याच्या गणेश नगर मधील ४२ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. दुसरीकडे आजच १० जण कोरोणा विषाणु संसर्गमुक्त देखील झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अॅटीव्ह रुग्णांची संख्या ही ८७ राहीली असून, यातील दोन जण धुळे तर एक जण नाशिक येथे उपचार घेत आहे.
जिल्ह्यात आतापर्यत १९५२ जणांचे  नमुऩे तपासणीसाठी धुळे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आलेले होते. यातील १७१८ अहवाल निगेटीव्ह आले असून ५४ अहवाल हे प्रलंबीत आहेत. या सरत्या आठवड्यामध्ये कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असून, या आठवड्याभरातच ८५ नव्या कोरोणा विषाणु बाधीतांचे अहवाल पॉझीटीव्ह आले असून, त्यातच आता पावसाळा सुरु झाल्याने साथीचे आजार देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोणा विषाणुचे संकट आणि पावसाळा या साऱया परिस्थीतीत नागरीकांनी अधिक जागृत राहुन कुठलेही लक्षण आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला संपर्क करण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडुन केले जात आहे.