नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : देशातील सैनिकाच्या कल्याणासाठी शासकीय आश्रमशाळा तोरणमाळ  येथील मुख्याध्यापक प्रदीप गणेश पाटील यांनी स्वत:च्या वैयक्तिक पगारातून 1 लाखाचा निधी  जिल्हा सैनिक कार्यालयास सैनिक सहायता निधीसाठी दिला आहे. त्यांनी पत्नी सुजाता व कन्या मधुरा यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचेकडे धनादेश सुपूर्द केला.

श्री.पाटील यांची कृती इतरांसाठी आदर्श व प्रेरक असल्याचे डॉ.भारुड म्हणाले. देशासाठी आपल्याला काही देणे लागते.आपण दिलेल्या निधीतून देशासाठी शहीद झालेल्यांच्या विधवा पत्नी व पाल्यांना मदत होईल होईल अशी भावना श्री.पाटील यांनी व्यक्त केली.